Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योना 4:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेव्हा देव योनाला म्हणाला, “तुंबीवरून तू रागवावे हे बरे काय?” तो म्हणाला, “रागामुळे माझा प्राण गेला तरी पुरवले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मग देव योनाला म्हणाला, “त्या वेलीमुळे तुला राग येणे हे चांगले आहे काय?” तो म्हणाला, “रागामुळे माझा जीव गेला तरी चालेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 तेव्हा परमेश्वर योनाहला म्हणाले, “रोपट्यामुळे तू रागवावेस, हे योग्य आहे का?” तो म्हणाला, “होय, तेच योग्य आहे. मला इतका राग आला आहे की मला मरावेसे वाटते.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




योना 4:9
13 Iomraidhean Croise  

“मी आपल्या वाडवडिलांचे वतन तुला देणार नाही,” असे इज्रेलकर नाबोथ म्हणाला, म्हणून अहाब उदास व खिन्न होऊन आपल्या घरी गेला. तो जाऊन बिछान्यावर पडला आणि आपले तोंड फिरवून अन्न सेवन करीना.


अरे क्रोधाने स्वतःस फाडून टाकणार्‍या, तुझ्यामुळे पृथ्वी ओस पडेल काय? खडक आपल्या ठिकाणचा ढळेल काय?


आपल्या क्रोधाने मोहात पडून तू अपमान करण्यास प्रवृत्त होऊ नकोस; हा खंड भारी आहे म्हणून बहकू नकोस.


मूर्ख तर चिंता करून करून नाश पावतो; वेडा मत्सराने मरतो.


ह्याचे योनाला फार वाईट वाटले व त्याला राग आला.


परमेश्वर म्हणाला, “ह्या तुंबीसाठी तुला काही श्रम पडले नाहीत, तू हिला वाढवले नाहीस, ही एका रात्रीत वर आली व एका रात्रीत मेली, हिची तू इतकी पर्वा करतोस!


मग असे झाले की सूर्योदय झाल्यावर देवाने पूर्वेचा झळईचा वारा वाहवला, तेव्हा ऊन योनाच्या डोक्याला लागले; त्याने तो मूर्च्छित झाला व आपणाला मृत्यू येवो, अशी विनवणी करून तो म्हणाला, “मला जगण्यापेक्षा मरणे बरे वाटते!”


तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “‘माझा जीव’ मरणप्राय, ‘अति खिन्न झाला आहे,’ तुम्ही येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.”


कारण ईश्वरप्रेरित दुःख तारणदायी पश्‍चात्तापास कारणीभूत होते, त्याबद्दल वाईट वाटत नाही; पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते.


त्या दिवसांत माणसे ‘मरणाची संधी शोधतील तरी ती त्यांना’ मिळणार ‘नाही;’ मरण्याची उत्कंठा धरतील, तरी मरण त्यांच्यापासून दूर पळेल.


तिच्या ह्या रोजच्या कटकटीमुळे व हट्टामुळे त्याला जीव नकोसा झाला,


Lean sinn:

Sanasan


Sanasan