Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योना 4:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 परमेश्वर देवाने तुंबीचा एक वेल उगववला आणि तो वाढून त्याची छाया योनाच्या डोक्यावर यावी व त्याने पीडेतून मुक्त व्हावे असे केले. ह्या तुंबीमुळे योनाला फार आनंद झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मग परमेश्वर देवाने योनाच्या डोक्यावर सावलीसाठी एक वेली उगविली, म्हणजे त्याने दुःखातून मुक्त व्हावे असे केले. त्या वेलीमुळे योनाला खूप आनंद झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 मग याहवेह परमेश्वराने योनाहच्या डोक्यावर छाया पडावी आणि त्याला त्रास होऊ नये म्हणून एक वेलाचे रोपटे वाढविले. त्या रोपामुळे योनाहला खूप आनंद झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योना 4:6
11 Iomraidhean Croise  

त्या दिवशी हामान आनंदित व प्रसन्नचित्त होऊन बाहेर निघाला; पण राजवाड्याच्या दरवाजाजवळ आपणास पाहून मर्दखय उठला नाही की थरथर कापला नाही हे हामानाने पाहिले तेव्हा त्याचा त्याला फार क्रोध आला;


आपल्याला सावलीत कधी बसायला मिळेल म्हणून दास उत्कंठित होतो, मजूर आपल्या वेतनाची वाट पाहतो,


जे पाहता पाहता नाहीसे होते त्याकडे तू नजर लावावीस काय? कारण गगनात उडणार्‍या गरुडासारखे पंख धन आपणास लावते.


तेव्हा त्यांच्यावर हिज्कीयाने खूश होऊन त्यांना आपले अमोल भांडार दाखवले; आपले सोनेरुपे, सुगंधी द्रव्ये, उत्तम तेल, सगळे शस्त्रागार, सारांश, आपल्या भांडागारात होते नव्हते ते सगळे त्याने त्यांना दाखवले, त्याच्या घरात व सगळ्या राज्यात त्यांना दाखवायचे काहीएक राहिले नाही.


तुम्ही अस्तित्वात नसलेल्या गोष्टीबद्दल हर्ष करता; तुम्ही म्हणता, “आम्ही आपल्या सामर्थ्याने सत्ता संपादली नाही काय?”


परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मासा सिद्ध केला होता; योना त्या माशाच्या पोटात तीन दिवस व तीन रात्री होता.


मग योना बाहेर जाऊन शहराच्या पूर्वेस बसला; तेथे त्याने एक मांडव घातला आणि शहराचे काय होते ते पाहत त्याच्या छायेत बसला.


पण दुसरा दिवस उजाडला तेव्हा देवाने एक किडा उत्पन्न केला; तो त्या तुंबीला लागला, तेव्हा ती सुकून गेली.


तथापि भुते तुम्हांला वश होतात ह्याचा आनंद मानू नका; तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत ह्याचा आनंद माना.”


जे रडतात त्यांनी रडत नसल्यासारखे; जे आनंद करतात त्यांनी आनंद करत नसल्यासारखे; जे विकत घेतात त्यांनी आपल्याजवळ काही नसल्यासारखे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan