Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योना 4:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तर उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यांना कळत नाही अशी एक लाख वीस हजारांहून अधिक माणसे व पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 ज्यांना उजव्या व डाव्या हाताचा फरक समजत नाही असे एक लाख वीस हजारांपेक्षा जास्त लोक या मोठ्या निनवे शहरात आहेत आणि पुष्कळ गुरेढोरे आहेत. त्यांची मी काळजी करू नये काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मग मी निनवेह या महान शहराची काळजी का करू नये? ज्यामध्ये एक लाख वीस हजारांहून अधिक लोक राहतात, ज्यांना त्यांच्या उजव्या आणि डाव्या हातातील फरक देखील माहीत नाही—आणि या शहरात अनेक प्राणीही आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




योना 4:11
17 Iomraidhean Croise  

त्याप्रमाणेच तुमच्याबरोबर असलेले सर्व सजीव प्राणी, म्हणजे तुमच्याबरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी, ग्रामपशू व पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी ह्यांच्याशीही मी करार करून ठेवतो.


तो जनावरांसाठी गवत आणि मनुष्याच्या उपयोगासाठी वनस्पती उगववतो; ह्यासाठी की, मनुष्याने भूमीतून अन्न उत्पन्न करावे;


तुझे नीतिमत्त्व महान1 पर्वतांसारखे आहे; तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहेत; हे परमेश्वरा, तू मनुष्य व पशू ह्यांचा प्रतिपाळ करतोस.


परमेश्वर म्हणतो, चला, या, आपण बुद्धिवाद करू; तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील; ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी निघतील.


ह्याप्रमाणे अश्शूराचा राजा सन्हेरीब तळ उठवून माघारी चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला.


कारण वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्या मुलाला समजू लागण्यापूर्वी ज्या दोन राजांच्या भीतीने तू घाबरला आहेस त्यांचा देश उजाड होईल.


“ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा व त्याच्याविरुद्ध आरोळी कर; कारण त्याची दुष्टता माझ्यापुढे आली आहे.”


देवाने त्यांचे वर्तन पाहिले म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले; तेव्हा ‘त्यांच्यावर अरिष्ट आणीन’ असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्यांच्यावर ते आणले नाही.


परमेश्वर म्हणाला, “ह्या तुंबीसाठी तुला काही श्रम पडले नाहीत, तू हिला वाढवले नाहीस, ही एका रात्रीत वर आली व एका रात्रीत मेली, हिची तू इतकी पर्वा करतोस!


मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय?’


आणि ही लुटली जातील असे ज्या तुमच्या मुलाबाळांविषयी तुम्ही म्हणालात ती, म्हणजे जी मुले आज बरेवाईट जाणत नाहीत ती त्या देशात जातील, मी तो त्यांना देईन आणि ती तो वतन करून घेतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan