Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योना 3:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 न जाणो, कदाचित देव वळेल, अनुताप पावेल व आपल्या संतप्त क्रोधापासून फिरेल, म्हणजे आपला नाश होणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 कोण जाणो? परमेश्वर दया करतील आणि त्यांची इच्छा बदलू शकेल आणि त्यांचा तीव्र क्रोध शांत होईल आणि आपण विनाशापासून वाचू.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




योना 3:9
14 Iomraidhean Croise  

त्याने उत्तर दिले, “मूल जिवंत होते तोवर मी उपास केला व रुदन केले. मला वाटले, न जाणो, कदाचित परमेश्वर माझ्यावर कृपा करील व मूल जिवंत राहील;


त्याने आपल्या कराराचे स्मरण त्यांच्यासाठी करून आपल्या अपार दयेने त्यांची कीव केली.


तू आपला सर्व क्रोध आवरला आहेस; तू आपल्या कोपाची तीव्रता सोडून दिली आहेस.


हे परमेश्वरा, परत फीर; किती वेळ लावशील? तू आपल्या सेवकांवर करुणा कर.


ह्यास्तव आता तुम्ही आपले मार्ग व आपली कर्मे सुधारा, परमेश्वर तुमचा देव ह्याची वाणी तुम्ही ऐका, म्हणजे तुमच्यावर जे अरिष्ट आणीन असे परमेश्वर बोलला त्याविषयी त्याला अनुताप होईल.


म्हणून महाराज, माझी मसलत आपण मान्य करावी; आपण पाप सोडून न्यायनीतीचे आचरण करावे; अधर्म सोडून गरिबांवर दया करावी; अशाने कदाचित आपले स्वास्थ्य अधिक काळ राहील.”


वाइटाचा द्वेष करा, बर्‍याची आवड धरा, वेशीत न्याय स्थापित करा; परमेश्वर, सेनाधीश देव योसेफाच्या अवशेषावर कदाचित दया करील.


मग त्यांनी योनाला धरून समुद्रात फेकून दिले तेव्हा समुद्र खवळायचा राहिला.


तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “अरे, झोप घेत काय पडलास? ऊठ, आपल्या देवाचा धावा कर, न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हायचा नाही.”


तो परमेश्वराला विनंती करू लागला की, “हे परमेश्वरा, मी आपल्या देशात होतो तेव्हा हे माझे म्हणणे होते की नाही! म्हणूनच मी तार्शीशास पळून जाण्याची त्वरा केली. मला ठाऊक होते की तू कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासंपन्न, अरिष्ट आणल्याबद्दल अनुताप करून घेणारा असा देव आहेस.


देशातील सर्व नम्र जनांनो, परमेश्वराच्या न्यायानुसार चालणार्‍यांनो, त्याचा आश्रय करा, नीतिमत्ता व नम्रता ह्याचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टीआड व्हाल.


ह्यास्तव ज्या ग्रंथींनी आणि उंदरांनी तुमच्या देशाचा नाश होत आहे त्यांच्या प्रतिमा करा; आणि इस्राएलाच्या देवाचा महिमा मान्य करा म्हणजे कदाचित तो तुमच्यावरला, तुमच्या देवांवरला व तुमच्या देशावरला आपला हात काढील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan