Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योना 3:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 निनवेच्या राजाला हे वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोणताट नेसून राखेत बसला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 निनवेच्या राजाला ही बातमी समजली, तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपला झगा आपल्या अंगातून काढून तो गोणताट नेसून राखेत बसला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 जेव्हा योनाहची चेतावणी निनवेहच्या राजापर्यंत पोहोचली, तेव्हा तो आपल्या सिंहासनावरून उठला, आपली राजवस्त्रे काढून बाजूला ठेवली व गोणपाट परिधान करून तो राखेत जाऊन बसला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योना 3:6
20 Iomraidhean Croise  

एलीयाचे हे शब्द ऐकून अहाबाने आपली वस्त्रे फाडली व अंगास गोणपाट गुंडाळून उपवास केला; तो गोणपाटावर निजू लागला व मंद गतीने चालू लागला.


ईयोबाने आपले अंग खाजवण्यासाठी एक खापरी घेतली; आणि तो जाऊन राखेत बसला.


म्हणून मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्‍चात्ताप करीत आहे.”


आपल्या पेठांत ते गोणपाट नेसून आहेत; आपल्या धाब्यांवर व चौकांत ते सगळे आकांत करत आहेत, अश्रू ढाळत आहेत.


राजाला व राजमातेला सांग, “आसनावरून खाली बसा; कारण तुमच्या वैभवाचा मुकुट तुमच्या शिरावरून खाली पडत आहे.”


तेव्हा बारुखाने त्या ग्रंथातली लोकांच्या कानी पाडलेली जी सर्व वचने मीखायाने ऐकली होती ती त्याने त्यांना कळवली.


राजाने व त्याच्या सेवकांनी ही सर्व वचने ऐकली, तेव्हा ते कोणी घाबरले नाहीत, कोणी आपली वस्त्रे फाडली नाहीत.


माझ्या लोकांच्या कन्ये, कंबरेला गोणपाट गुंडाळ, राखेत लोळ; एकुलत्या एका मुलाविषयीच्या शोकाप्रमाणे शोक व आक्रंदन कर; कारण लुटारू आमच्यावर एकाएकी येईल.


सीयोनकन्येचे वडील जन जमिनीवर बसले आहेत, ते स्तब्ध आहेत; त्यांनी आपल्या डोक्यांवर धूळ उडवली आहे; त्यांनी गोणपाटाची वस्त्रे परिधान केली आहेत; यरुशलेमेच्या कुमारी आपली डोकी भूमीपर्यंत लववत आहेत.


त्याने आपले तोंड मातीत खुपसावे, कदाचित अद्यापि आशा असेल.


तेव्हा सर्व दर्यावर्दी सरदार आपापल्या आसनांवरून उतरून खाली येतील, आपले झगे काढून ठेवतील, आपली जरतारी वस्त्रे काढून टाकतील; ते भीतिरूप वस्त्रे धारण करून जमिनीवर बसतील, क्षणोक्षणी त्यांचा थरकाप होईल व तुझ्याविषयी ते विस्मय पावतील.


हे जाणून मी आपले मुख प्रभू देवाकडे लावून प्रार्थना, विनवण्या, उपास, गोणताट नेसणे व अंगावर राख उधळणे हे चालू केले.


गथात हे कळवू नका, मुळीच रडू नका; बेथ-ले-अफ्रात (धुळीच्या गृहात) मी धुळीत लोळलो.


“हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सीदोन ह्यांत घडली असती तर त्यांनी मागेच गोणपाट व राख अंगावर घेऊन पश्‍चात्ताप केला असता.


हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सीदोन ह्यांत घडली असती तर त्यांनी मागेच गोणपाट व राख अंगावर घेऊन बसून पश्‍चात्ताप केला असता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan