Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योना 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 पण मी तुला आभारप्रदर्शनाचे यज्ञ करीन; मी केलेले नवस फेडीन; तारण परमेश्वरापासून होते.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 परंतु मी आभार मानण्याच्या वाणीने तुझ्याकडे यज्ञ अर्पण करीन; जो नवस मी केला आहे तो मी पूर्ण करीन, तारण परमेश्वराकडूनच आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 परंतु मी, उपकारस्तुतीच्या जयघोषाने, तुमच्यासाठी यज्ञ अर्पण करेन. मी जो नवस केला होता, तो मी पूर्ण करेन. मी म्हणेन, ‘तारण याहवेहकडून येते.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




योना 2:9
24 Iomraidhean Croise  

आपण उठून वर बेथेलास जाऊ; तेथे मी देवासाठी वेदी बांधीन; त्याने माझ्या संकटसमयी माझे ऐकले; आणि ज्या वाटेने मी प्रवास करत होतो तिच्यात तो माझ्याबरोबर होता.”


चार वर्षे संपल्यावर अबशालोम राजाला म्हणाला, “मला परवानगी असावी, म्हणजे परमेश्वराला मी जो नवस केला आहे तो हेब्रोन येथे जाऊन फेडीन.


तू त्याची प्रार्थना केलीस म्हणजे तो तुझे ऐकेल; आणि तू आपले नवस फेडशील.


ते त्याला उपकारस्मरणरूपी यज्ञ अर्पोत, व स्तोत्रे गाऊन त्याची कृत्ये वर्णोत.


परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे; मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे मी कोणाचे भय धरू?


तारण परमेश्वराच्या हातून होते; तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो. (सेला)


देवाला आभाररूपी यज्ञ कर; परात्परापुढे आपले नवस फेड;


जो आभाररूपी यज्ञ करतो तो माझा गौरव करतो; आणि जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन.”


देव आम्हांला संकटांतून मुक्त करणारा देव आहे; आणि मृत्यूपासून सोडवणारा प्रभू परमेश्वर आहे.


उपकारस्मरण करीत आपण त्याच्यापुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.


इस्राएलास परमेश्वराकडून सर्वकाळचा उद्धार प्राप्त झाला आहे; तुम्ही अनंतकाळ लज्जित व फजीत होणार नाही.


त्यांत आनंद व हर्ष ह्यांचा ध्वनी होईल, नवर्‍याची व नवरीची वाणी ऐकू येईल; ‘सेनाधीश परमेश्वराची स्तुती असो, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सर्वकाळची आहे,’ असे म्हणून जे परमेश्वराच्या मंदिरात स्तुत्यर्पणे आणतात त्यांचा शब्द पुन्हा ऐकू येईल. कारण मी देशाचा बंदिवास उलटवून आरंभी होते तसे सर्वकाही करीन, असे परमेश्वर म्हणतो.


तुम्ही शब्दांनिशी परमेश्वराकडे वळा; त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर; कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू.


तुम्हांला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता; आम्हांला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो; कारण यहूद्यांतूनच तारण आहे.


आणि तारण दुसर्‍या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.”


म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.


वेश्येच्या कमाईचा किंवा कुत्र्याच्या3 प्राप्तीचा पैसा कोणताही नवस फेडण्यासाठी तू आपला देव परमेश्वर ह्याच्या घरात आणू नकोस, कारण ह्या दोन्हींचाही तुझा देव परमेश्वर ह्याला वीट आहे.


म्हणून त्याचे नाव पत्करणार्‍या ‘ओठांचे फळ’ असा ‘स्तुतीचा यज्ञ’ आपण त्याच्या द्वारे ‘देवाला नित्य अर्पण करावा.’


ते उच्च स्वराने म्हणत होते : “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकर्‍याकडून, तारण आहे!”


ज्या निरर्थक वस्तूंपासून तुम्हांला काही लाभ किंवा तुमचा उद्धार होणे शक्य नाही त्यांच्यामागे लागू नका, कारण त्या केवळ निरर्थक होत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan