Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योना 2:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मी खाली पर्वतांच्या तळी गेलो होतो; पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले होते; तरी परमेश्वरा, माझ्या देवा, तू गर्तेतून माझा जीव उद्धरला आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 मी पर्वतांच्या तळापर्यंत गेलो; पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले; तथापि माझ्या देवा परमेश्वरा, तू माझा जीव खड्डयातून वरती काढला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 मी पर्वतांच्या मुळाशी पोहोचलो होतो; मी कायमचा जमिनीत बंदिस्त झालो होतो. तरीसुद्धा, हे याहवेह माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा जीव खड्ड्यातून वर आणला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योना 2:6
25 Iomraidhean Croise  

तर देव त्याच्यावर प्रसन्न होऊन म्हणेल, ‘ह्याचा बचाव कर, ह्याला गर्तेत पडू देऊ नकोस; मला खंड मिळाला आहे.’


त्याने माझा जीव राखला, मला गर्तेत पडू दिले नाही, माझ्या जिवाला प्रकाश लाभला आहे.’


तिला तू वस्त्राप्रमाणे जलाशयाने आच्छादलेस, पर्वतांवर जले स्थिर राहिली;


ती पर्वतांवरून जाऊन खाली खोर्‍यांतून वाहिली, त्यांच्यासाठी तू नेमलेल्या स्थळी ती जाऊन राहिली.


मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टले, मला अधोलोकाच्या यातना झाल्या, मला उपद्रव व क्लेश झाले,


हे परमेश्वरा, त्वरा करून माझे ऐक; माझा आत्मा गळून गेला आहे; तू आपले तोंड माझ्यापासून लपवू नकोस; लपवशील तर मी गर्तेत उतरणार्‍यांसारखा होईन.


कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस; तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस;


अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरले, मृत्यूचे पाश माझ्यावर आले.


हे परमेश्वरा, तू माझा जीव अधोलोकातून वर काढलास; गर्तेत पडलेल्यांमधून तू मला जिवंत राखलेस.


“मी मृत्यू पावल्याने, मी गर्तेत पडल्याने काय लाभ? माती तुझी स्तुती करील काय? ती तुझे सत्य प्रकट करील काय?


हे देवा, तू त्यांना गर्तेच्या तोंडात लोटून देशील. खुनी व कपटी माणसे अर्धे आयुष्यही जगणार नाहीत; मी तर तुझ्यावर भाव ठेवीन.


तू पराक्रमाने कंबर बांधून आपल्या सामर्थ्याने पर्वत स्थिर ठेवतोस.


मी खोल दलदलीत रुतलो आहे, तेथे उभे राहण्यास आधार नाही; मी खोल पाण्यात आलो आहे, आणि लोंढा माझ्यावरून जात आहे.


मी म्हटले, माझ्या आयुष्याच्या सुखावस्थेत1 मी अधोलोकाच्या द्वारात प्रवेश करीन; माझ्या आयुष्याची अवशिष्ट वर्षे माझ्यापासून हिरावून घेतली आहेत.


पाहा, माझ्या बर्‍यासाठीच ही पीडा मला झाली; तू माझा जीव नाशगर्तेतून मायेने उद्धरला; कारण तू माझी सर्व पापे आपल्या पाठीमागे टाकली आहेत.


जलांचे माप आपल्या चुळक्याने कोणी केले आहे? आकाशाचे माप आपल्या वितीने कोणी घेतले आहे? पृथ्वीची धूळ मापाने कोणी मापली आहे? डोंगर काट्याने व टेकड्या तराजूने कोणी तोलल्या आहेत?


तेव्हा गर्तेत गेलेल्या प्राचीन काळच्या लोकांकडे तुला खाली टाकून गर्तेत गेलेल्यांबरोबर प्राचीन काळापासून ओसाड असलेल्या स्थानांत पृथ्वीच्या अधोभागी तुला राहायला लावीन म्हणजे तू पुन्हा वसणार नाहीस; पण मी जिवंतांच्या भूमीला वैभव देईन.


पाण्यानजीक लावलेल्या कोणत्याही वृक्षाने आपल्या उंचीमुळे गर्व करू नये; आपल्या शेंड्याने मेघमंडळास भेदू नये, पाण्याने पोसलेल्या वृक्षाने आपल्या उंचीमुळे स्वतःवर भिस्त ठेवू नये म्हणून हे घडून आले आहे; कारण त्या सर्वांना मृत्यूच्या, अधोलोकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे; ज्या गर्तेत मानवपुत्र जातात तिच्यात त्यांनाही जायला लावले आहे.


पर्वत तुला पाहून विव्हळतात; जलप्रवाह सपाट्याने चालला आहे, डोह आपला शब्द उच्चारतो, आपले हात वर करतो.


तो उभा राहिला म्हणजे पृथ्वी हेलकावे खाते; तो नजर टाकून राष्ट्रांना उधळून लावतो. सर्वकाळचे पर्वत विदीर्ण होतात, युगानुयुगीचे डोंगर ढासळतात, त्याचा हा पूर्वकाळापासून प्रघात आहे.


आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही.


कारण माझ्या कोपाने आग लागली आहे, अधोलोकाच्या तळापर्यंत ती पसरली आहे, पृथ्वी व तिचा उपज ती भस्म करीत आहे, व डोंगरांचे पायथे जाळून टाकीत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan