योना 2:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तो म्हणाला, “मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले; अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली, तेव्हा तू माझा शब्द ऐकलास. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तो म्हणाला, “मी आपल्या आपत्तीमध्ये परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने मला उत्तर दिले; मी मृत्यूलोकाच्या पोटातून मदतीकरता हाक मारली! तू माझा आवाज ऐकलास. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तो म्हणाला: “माझ्या संकटात मी याहवेहचा धावा केला आणि त्यांनी मला उत्तर दिले. मृत्यूच्या खोल अधोलोकातून मी मदतीसाठी हाक मारली आणि तुम्ही माझी हाक ऐकली. Faic an caibideil |
पाण्यानजीक लावलेल्या कोणत्याही वृक्षाने आपल्या उंचीमुळे गर्व करू नये; आपल्या शेंड्याने मेघमंडळास भेदू नये, पाण्याने पोसलेल्या वृक्षाने आपल्या उंचीमुळे स्वतःवर भिस्त ठेवू नये म्हणून हे घडून आले आहे; कारण त्या सर्वांना मृत्यूच्या, अधोलोकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे; ज्या गर्तेत मानवपुत्र जातात तिच्यात त्यांनाही जायला लावले आहे.