Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योना 1:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 खलाशी घाबरले व आपापल्या दैवतांचा धावा करू लागले; मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तेव्हा खलाशी घाबरले आणि प्रत्येकजण आपल्या देवाला हाक मारू लागले व जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून देऊ लागले; परंतु योना तर जहाजाच्या अगदी सर्वात आतल्या भागात उतरून जाऊन तेथे तो गाढ झोपला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 सर्व खलाशी घाबरले आणि प्रत्येकजण आपआपल्या दैवतांचा धावा करू लागला. आणि जहाजाचा भार कमी व्हावा म्हणून त्यांनी जहाजात भरलेले साहित्य समुद्रात टाकण्यास सुरुवात केली. पण योनाह मात्र जहाजाच्या तळघरात अगदी गाढ झोपला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योना 1:5
22 Iomraidhean Croise  

मग त्यांना दिलेला गोर्‍हा त्यांनी सिद्ध केला आणि सकाळपासून थेट दोन प्रहरपर्यंत ते बआलाचे नाव घेत, “हे बआला, आमचे ऐक,” असे म्हणत राहिले; पण काही वाणी झाली नाही की कोणी उत्तर दिले नाही. जी वेदी त्यांनी केली होती तिच्याभोवती ते नाचूबागडू लागले.


सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, “त्वचेसाठी त्वचा! मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल.


तो आज्ञा करून वादळ उठवतो, तेव्हा त्याच्या लाटा उसळतात.


अग्नी, गारा, हिम व धुके, त्याची आज्ञा सिद्धीस नेणारे वादळ,


शोधण्याचा समय व गमावण्याचा समय; राखून ठेवण्याचा समय व टाकून देण्याचा समय असतो;


“राष्ट्रांतून निभावलेल्यांनो, जमा होऊन या, सर्व मिळून जवळ या; जे असल्या कोरीव मूर्ती म्हणजे केवळ लाकडे मिरवतात व उद्धार न करणार्‍या दैवतांची प्रार्थना करतात ते ज्ञानशून्य आहेत.


तर तू आपणांसाठी केलेले देव कोठे आहेत? तुझ्या संकटसमयी ते उठून तुला वाचवतील की काय ते पाहा, कारण हे यहूदा, तुझ्या नगरांइतकी तुझ्या दैवतांची संख्या आहे.


त्यांनी कधी मनापासून माझा धावा केला नाही; ते आपल्या बिछान्यांवर पडून धान्य व द्राक्षारस ह्यांसाठी ओरडतात; ते जमा होऊन माझ्याविरुद्ध बंड करतात.


तेव्हा ते परमेश्वराचा धावा करून म्हणाले, “हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो की ह्या माणसाच्या जिवामुळे आम्हांला मारू नकोस व निर्दोष जीव घेतल्याचा दोष आमच्यावर आणू नकोस; कारण तू परमेश्वर आहेस, तुला इष्ट ते तू करतोस.”


त्या माणसांना तर परमेश्वराचा फार धाक पडला; त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला व नवसही केले.


तेव्हा जहाजाचा तांडेल त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “अरे, झोप घेत काय पडलास? ऊठ, आपल्या देवाचा धावा कर, न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हायचा नाही.”


मग वराला विलंब लागला व त्या सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली.


मग त्याने पुन्हा येऊन ते झोपी गेले आहेत असे पाहिले; कारण त्यांचे डोळे जड झाले होते.


आणि तो आपल्या शिष्यांकडे येऊन त्यांना म्हणाला, “आता झोप व विसावा घ्या, पाहा, घटका जवळ आली आहे, आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे.


जेवून तृप्त झाल्यावर ते समुद्रात गहू टाकून देऊन तारू हलके करू लागले.


तिने शमशोनाला आपल्या मांडीवर झोपवले; आणि एक मनुष्य बोलावून त्याच्या डोक्याच्या सात बटांचे मुंडण करवले. मग ती त्याला सतावू लागली आणि तो निर्बल झाला.


वाटेने जाताना तो एका मेंढवाड्याजवळ आला, तेथे एक गुहा होती; तिच्या आत शौल बहिर्दिशेस गेला. गुहेच्या अगदी आतल्या बाजूला दावीद व त्याचे लोक बसले होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan