Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योना 1:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा व त्याच्याविरुद्ध आरोळी कर; कारण त्याची दुष्टता माझ्यापुढे आली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 “ऊठ, व त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि तिकडे जाऊन त्याच्याविरुध्द आरोळी कर; कारण त्यांची दुष्टता मजसमोर वर आली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “महान शहर निनवेहस जा आणि त्याविरुद्ध संदेश दे, कारण त्यांची दुष्टाई माझ्यासमोर आली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




योना 1:2
24 Iomraidhean Croise  

त्या देशातून तो पुढे अश्शूरास गेला व त्याने निनवे, रहोबोथ-ईर व कालह ही वसवली;


मग अश्शूराचा राजा सन्हेरीब तळ उठवून माघारा चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला.


पण ओदेद नावाचा परमेश्वराचा एक संदेष्टा तेथे होता; शोमरोनास सैन्य परत आले तेव्हा त्याला मार्गात गाठून तो म्हणाला, “पाहा, तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर हा यहूदावर रागावला म्हणून त्याने त्याला तुमच्या हाती दिले; तुम्ही इतक्या क्रोधाने त्यांची कत्तल केली की तो गगनापर्यंत पोहचला आहे.


“हे माझ्या देवा, मला लाज वाटते. मला तुझ्यापुढे तोंड वर करण्यास शरम वाटते, कारण आमचे अपराध वाढून आमच्या डोक्यावरून गेले आहेत व आमचे दोष वाढून गगनास जाऊन पोहचले आहेत.


ह्याप्रमाणे अश्शूराचा राजा सन्हेरीब तळ उठवून माघारी चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला.


“कंठरव कर, कसर करू नकोस; आपला स्वर कर्ण्याप्रमाणे मोठा कर; माझ्या लोकांना त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्याची पातके विदित कर.


मी म्हणालो, “मी त्याचे नाव काढणार नाही, ह्यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही, तेव्हा त्याचे वचन माझ्या हृदयात जणू हाडात कोंडलेल्या अग्नीसारखे जळत होते आणि मी स्वतःला आवरता आवरता थकलो, पण मला ते साधेना.


ते ऐकोत न ऐकोत, तू माझी वचने त्यांना साग; ते तर अत्यंत फितुरी आहेत.


त्यांच्या सर्व दुष्टतेचे स्मरण मला आहे हे ते लक्षात आणत नाहीत; आता त्यांच्याच कर्मांनी त्यांना घेरले आहे; ती माझ्या नजरेसमोर आहेत.


“ऊठ; त्या मोठ्या निनवे शहरास जा व मी तुला सांगेन तो संदेश त्याला आरोळी करून सांग.”


तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला. निनवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास तीन दिवस लागत.


तर उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यांना कळत नाही अशी एक लाख वीस हजारांहून अधिक माणसे व पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय?”


मी तर याकोबाला त्याचा अपराध आणि इस्राएलास त्याचे पाप दाखवण्यास खरोखर परमेश्वराच्या आत्म्याने, सामर्थ्याने, न्यायाने व बळाने पूर्ण आहे.


निनवेविषयीची देववाणी : नहूम एल्कोशकर ह्याला प्राप्त झालेल्या दृष्टान्ताचे पुस्तक.


तुझी जखम भरत नाही; तुझा घाय असाध्य आहे; तुझी बातमी ऐकणारे सर्व तुझ्याविषयी टाळ्या पिटतात; कारण ज्याला तुझी दुष्टता सतत जाचली नाही असा कोण आहे?


आणि तुम्हांला माझ्यामुळे देशाधिकारी व राजे ह्यांच्यापुढे नेण्यात येईल, आणि तुम्ही त्यांना आणि परराष्ट्रीयांना साक्ष व्हाल.


निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्‍चात्ताप केला; आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे.


पाहा, ज्या कामकर्‍यांनी तुमची शेते कापली त्यांची ‘तुम्ही’ अडकवून ठेवलेली ‘मजुरी ओरडत आहे;’ आणि कापणी करणार्‍यांचा आक्रोश ‘सेनाधीश प्रभूच्या कानी’ गेला आहे.


कारण तिच्या ‘पापांची रास स्वर्गापर्यंत पोहचली’ आहे; आणि तिची अनीती देवाने लक्षात घेतली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan