Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योएल 3:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 आणि तुमचे पुत्र व कन्या ह्यांना विकून यहूद्यांच्या हाती देईन आणि ते त्यांना दूरच्या राष्ट्रांना म्हणजे शबाई लोकांना विकतील असे परमेश्वराने म्हटले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मी तुमच्या मुलांना आणि मुलींना यहूदी लोकांच्या हाती विकीन. मग ते त्यांना शबाच्या लोकांस दूरच्या राष्ट्रांस विकतील. कारण परमेश्वर हे बोलला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मी तुमचे पुत्र व तुमच्या कन्या यहूदीयातील लोकांना विकून टाकेन आणि ते त्यांना दूरच्या शबाई लोकांस विकतील.” याहवेहने हे म्हटले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योएल 3:8
12 Iomraidhean Croise  

तेव्हा शबाई लोक घाला घालून त्यांना घेऊन गेले; त्यांनी तलवारीच्या धारेने गड्यांना वधले; हे तुला सांगायला मी एकटाच निभावून आलो आहे.”


तार्शीश व द्वीपे ह्यांचे राजे खंडणी देवोत, शबा व सबा ह्यांचे राजे नजराणे आणोत.


तुला पीडा करणार्‍यांची मुले तुझ्याकडे नमत येतील, तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चरणी लोटांगण घालतील; तुला परमेश्वराचे नगर, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे सीयोन म्हणतील.


तुला ग्रासून टाकणार्‍या सर्वांना ग्रासून टाकण्यात येईल आणि तुझे सर्व वैरी बंदिवान होऊन जातील; तुझे हरण करणार्‍यांचे हरण होईल, तुला लुटणार्‍या सर्वांना मी लुटवीन.


शबाहून ऊद व दूर देशाहून अगरू माझ्याकडे आणण्याचे काय प्रयोजन? तुमच्या होमबलींनी मला संतोष नाही, तुमचे यज्ञबली मला पसंत नाहीत.


तेथे चैनी लोकांची धामधूम चालू झाली; सामान्य पुरुषांबरोबर रानातून आणखी दारूबाज लोक आणण्यात आले; त्यांनी त्यांच्या हातांत बांगड्या घातल्या व डोक्यांना उत्तम शिरोभूषणे घातली.


शबा, ददान आणि तार्शीश येथले व्यापारी व त्यांचे सर्व तरुण सिंह तुला म्हणतील, ‘तू लुटालूट करण्यास आलास काय? तू मालमत्ता हरण करण्यासाठी आपला सेनासमूह जमवला आहेस काय? सोनेरुपे न्यावे, गुरेढोरे व माल न्यावा आणि मोठी लूट करावी म्हणून तू आला आहेस काय?’


त्यांच्या दुर्गाने त्यांचा विक्रय केला नसता, परमेश्वराने त्यांना परकीयांच्या हाती दिले नसते, तर एकाने सहस्रांचा पाठलाग कसा केला असता! दोघांनी दशसहस्रांना कसे पळवले असते!


म्हणून इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला; त्याने त्यांना लुटारूंच्या हाती दिले आणि लुटारूंनी त्यांना लुटले. परमेश्वराने त्यांना त्यांच्या सभोवतालच्या शत्रूंच्या हवाली केले; म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना.


तेव्हा परमेश्वराने याबीन नावाचा कनानाचा राजा जो हासोरात राज्य करत होता त्याच्या हाती त्यांना दिले; त्याचा सेनापती सीसरा हा हरोशेथ-गोयीम येथे राहत असे.


ती म्हणाली, “मी तुझ्याबरोबर अवश्य येईन, पण ह्या तुझ्या स्वारीत तुझी प्रतिष्ठा होणार नाही, कारण परमेश्वर सीसरा ह्याला एका स्त्रीच्या हाती देणार आहे.” मग दबोरा उठली आणि बाराकाबरोबर केदेश येथे गेली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan