तेव्हा यहूदाचा राजा यहोआश ह्याने असे केले : त्याचे वाडवडील, यहोशाफाट, यहोराम व अहज्या ह्या यहूदाच्या राजांनी व त्याने स्वतः ज्या वस्तू परमेश्वराला वाहिल्या होत्या त्या, आणि परमेश्वराच्या मंदिराच्या व राजभवनाच्या भांडारात जेवढे सोने सापडले ते सर्व घेऊन त्याने अरामाचा राजा हजाएल ह्याच्याकडे पाठवले; तेव्हा तो यरुशलेमेजवळून निघून गेला.