Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योएल 3:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 सोर, सीदोन व पलेशेथाचे सर्व प्रदेशहो, तुम्ही माझे काय करणार? मी केलेल्याचा बदला घेता काय? अथवा मला काही करता काय? मी त्वरेने तुमचे कृत्य तुमच्या माथी मारीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 सोर, सीदोन व पलिष्टीच्या सर्व प्रांतानो, आता तुम्ही माझ्यावर का रागावता? तुम्ही माझी परत फेड कराल का? जरी तुम्ही माझी परत फेड केली तरी, मी त्वरेने तुमचा सूड तुमच्याच मस्तकावर फिरवीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 “अहो सोर आणि सीदोन, पलेशेथच्या शहरांनो, आता तुमच्याजवळ माझ्याविरुद्ध काय आहे? मी जे काही केले आहे त्याची परतफेड मला करीत आहात काय? तुम्ही मजवर सूड उगविण्याचा प्रयत्न करीत आहात काय? कारण मी त्वरेने उलट प्रहार करेन आणि तुमचेच कृत्य तुमच्या माथ्यावर उलटवेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योएल 3:4
24 Iomraidhean Croise  

परमेश्वराने पलिष्टी व कूशी लोकांच्या शेजारचे अरबी लोक ह्यांची मने क्षुब्ध करून त्यांना यहोरामावर उठवले;


“हे समग्र पलेशेथा, तुला मारणारा सोटा मोडला आहे म्हणून आनंद करू नकोस, कारण सापाच्या मुळातून फुरसे निघेल, त्याचे फळ उडता आग्या साप होईल.


सीयोनेला न्याय मिळावा म्हणून सूड घेण्याचा हा परमेश्वराचा दिवस, प्रतिफळ देण्याचे हे वर्ष होय.


ज्याच्या-त्याच्या कर्माप्रमाणे तो प्रतिफळ देईल, म्हणजे आपल्या शत्रूंना संताप आणील, आपल्या वैर्‍यांना शासन करील, द्वीपांचे उसने फेडील.


फारोने गज्जावर मारा केला त्यापूर्वी पलिष्ट्यांविषयी परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे :


पलिष्ट्यांच्या नाशाचा दिवस येत आहे; सोर व सीदोन ह्यांना साहाय्य करणारा जो कोणी उरला असेल त्याचा उच्छेद होईल; परमेश्वर पलिष्ट्यांचा म्हणजे कफतोर द्वीपांतील अवशिष्ट लोकांचा नाश करणार आहे.


बाबेलातून पळून जा, तुम्ही आपापले जीव वाचवा; त्याच्या दुष्कर्मामुळे तुम्ही आपला नाश करून घेऊ नका; कारण हा परमेश्वराचा सूड घेण्याचा समय आहे; त्याच्या करणीचे तो त्याला प्रतिफळ देत आहे.


त्यांच्यापुढे पृथ्वी कापते, आकाश थरथरते. सूर्य व चंद्र काळे पडतात आणि तारे प्रकाशण्याचे थांबतात.


अंधाराचा व औदासिन्याचा दिवस, मेघमय अभ्राच्छादित दिवस येत आहे. डोंगरावर प्रभातेचा प्रकाश पसरतो तसे महान व बलवान राष्ट्र येत आहे; पूर्वी कधीच असा प्रकाश झाला नाही, पुढे पिढ्यानपिढ्या असा कधी होणार नाही.


“हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सीदोन ह्यांत घडली असती तर त्यांनी मागेच गोणपाट व राख अंगावर घेऊन पश्‍चात्ताप केला असता.


पण मी तुम्हांला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर व सीदोन ह्यांना तुमच्यापेक्षा सोपे जाईल.


हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर व सीदोन ह्यांत घडली असती तर त्यांनी मागेच गोणपाट व राख अंगावर घेऊन बसून पश्‍चात्ताप केला असता.


ह्यामुळे न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर व सीदोन ह्यांना सोपे जाईल.


तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय?


तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की, “शौला, शौला, माझा छळ का करतोस?”


सूड घेणे व उसने फेडणे हे माझ्याकडे आहे; त्यांचे पाय घसरतील तेव्हा हे घडेल; कारण त्यांचा संकटकाळ जवळ आला आहे, त्यांच्यावर ओढवणारे प्रसंग लवकर येत आहेत.’


तुमच्यावर संकट आणणार्‍या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणार्‍या तुम्हांला आमच्याबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे,


पुढे इफ्ताहाने अम्मोन्यांच्या राजाकडे जासूद पाठवून विचारले, “माझ्याकडे यायला व माझ्या देशाशी लढायला तुझे आणि माझे कोठे बिनसले आहे?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan