Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योएल 3:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा सर्व राष्ट्रे जमा करून यहोशाफाट2 ह्या नावाच्या खोर्‍यात आणीन आणि माझे लोक, माझे वतन इस्राएल, ह्यांना त्यांनी राष्ट्रांत विखरून माझा देश वाटून घेतला म्हणून तेथे त्यांच्यावर दावा मांडीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 मी, सर्व राष्ट्रांना गोळा करून, खाली यहोशाफाटाच्या दरीत आणीन. कारण माझ्या लोकांकरता आणि माझे वतन इस्राएल ज्यांना त्यांनी इतर राष्ट्रात पांगविले. आणि त्या राष्ट्रांनी माझा देश वाटून घेतला. तेथे मी त्यांचा न्यायनिवाडा करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मी सर्व राष्ट्रांना एकत्र करेन आणि त्यांना खाली यहोशाफाट च्या खोऱ्यात आणेन. त्यांनी माझ्या वतनास, माझ्या इस्राएली लोकांशी जे केले त्याबद्दल मी त्यांची परीक्षा घेईन. कारण त्यांनी माझ्या लोकांना राष्ट्रांमध्ये विखुरले आहे आणि माझ्या देशाचे विभाजन केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योएल 3:2
30 Iomraidhean Croise  

चौथ्या दिवशी ते बराखा (आशीर्वाद) नावाच्या खोर्‍यात एकत्र झाले; तेथे त्यांनी परमेश्वराचा धन्यवाद केला; त्या स्थळाला बराखा खोरे असे आजवर म्हणतात.


कारण परमेश्वर अग्नीने न्याय करील, सर्व मनुष्यजातीचा आपल्या तलवारीने न्याय करील; परमेश्वराने वधलेल्यांची संख्या मोठी असेल.


मी त्यांची कृत्ये व त्यांचे विचार जाणतो; सर्व राष्ट्रांनी व भिन्नभिन्न भाषा बोलणार्‍यांनी माझे वैभव पाहावे म्हणून मी त्यांना एकत्र करावे अशी वेळ आली आहे.


माझे लोक इस्राएल ह्यांना मी दिलेल्या वतनास जे माझे दुष्ट शेजारी हात लावतात त्या सर्वांविरुद्ध परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, मी त्यांना त्यांच्या देशातून उपटून टाकीन आणि त्यांच्यामधून यहूदाचे घराणे उपटून टाकीन.


पृथ्वीच्या दिगंतापर्यंत हा गोंगाट पोहचला आहे; कारण मी परमेश्वर राष्ट्रांशी प्रतिवाद करीत आहे, मी सर्व मानवजातीबरोबर वाद घालीत आहे, व दुष्टांना तलवारीच्या स्वाधीन करीत आहे, असे परमेश्वर म्हणतो.’


अम्मोनी लोकांविषयी : परमेश्वर म्हणतो, “काय? इस्राएलास कोणी पुत्र, कोणी वारस नाही काय? तर मिलकोम दैवताने1 गाद का घेतले? त्याचे लोक गादाच्या नगरांतून का वस्ती करून आहेत?


“इस्राएल भटकलेले मेंढरू आहे; सिंहांनी त्याला बुजवले आहे; त्याला प्रथम खाणारा अश्शूराचा राजा; शेवटी त्याची हाडे मोडणारा बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर.


प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मवाब व सेईर म्हणतात की, ‘पाहा, यहूदाचे घराणे इतर राष्ट्रांसारखेच आहे;’


माझी मेंढरे सर्व डोंगरांवरून, सर्व उंच टेकड्यांवरून भटकत आहेत; देशभर माझी मेंढरे उपलब्ध आहेत; त्यांची कोणाला शुद्ध नाही, कोणी त्यांना शोधत नाही.


‘ही दोन राष्ट्रे, हे दोन देश माझे आहेत, आपण त्यांचा ताबा घेऊ,’ असे तेथे परमेश्वर असता तू म्हणालास,


हे मानवपुत्रा, इस्राएलाच्या पर्वतांना संदेश देऊन सांग की, इस्राएलाच्या पर्वतांनो, परमेश्वराचे वचन ऐका.


राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेले व सगळा अदोम ह्यांनी उल्लासयुक्त मनाने व द्वेषबुद्धीने माझा देश लुटून फस्त करण्याच्या हेतूने तो आपल्या सत्तेत घेतला; ह्यास्तव मी त्यांच्याविरुद्ध ईर्ष्यायुक्त होऊन निश्‍चितपणे बोललो आहे.


मरी व रक्तपात ह्यांनी मी त्याच्याबरोबर वाद मांडीन; त्याच्यावर, त्याच्या सैन्यावर पाऊस, मोठ्या गारा, अग्नी व गंधक ह्यांची धो-धो वृष्टी मी त्याच्याबरोबर असलेल्या अनेक लोकसमूहांवर करीन.


त्या दिवशी असे होईल की मी समुद्राच्या पूर्वतीरी असलेले प्रवाशांचे खोरे गोगास इस्राएल देशात कबरस्तान म्हणून देईन; ते येणार्‍याजाणार्‍यांची वाट अडवील; तेथे गोग व त्याचा सर्व लोकसमूह ह्यांना पुरतील, आणि त्यास हमोन-गोग (गोगाचा लोकसमुदाय) ह्याचे खोरे असे म्हणतील.


राष्ट्रे उठावणी करून यहोशाफाटाच्या खोर्‍यात येवोत; तेथे मी न्यायासनावर बसून सभोवतालच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करणार आहे.


लोकांच्या झुंडी, निर्णयाच्या खोर्‍यात लोकांच्या झुंडी आहेत. कारण निर्णयाच्या खोर्‍यात परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे.


परमेश्वर म्हणतो, “अदोमाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; त्याने तलवार घेऊन आपल्या बंधूचा पाठलाग केला, त्याने आपला कळवळा दाबून टाकला, तो आपल्या क्रोधाने एकसारखा भडकत राहिला; त्याने आपला संताप सतत बाळगला.


पण त्यांना परमेश्वराचे विचार कळत नाहीत, त्याचे संकल्प ते समजत नाहीत; कारण खळ्यासाठी पेंढ्या गोळा करतात तसे त्याने त्यांना गोळा केले आहे.


परमेश्वर म्हणतो, “मी लुटीसाठी उठेन तोवर माझी वाट पाहा. कारण राष्ट्रे एकत्र जमवावीत, राज्ये एकत्र मिळवावीत; त्यांच्यावर माझा क्रोध, माझा सर्व संतप्त क्रोध पडावा हा माझा निश्‍चय आहे; कारण माझ्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल.


‘राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली,’ तुझ्या ‘क्रोधाची’ वेळ आली; मृतांचा न्याय करण्याची वेळ, आणि ‘तुझे दास संदेष्टे’ व तुझे पवित्र जन व तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहानथोर ह्यांना वेतन देण्याची वेळ, आणि पृथ्वीची नासाडी करणार्‍यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.”


ते चिन्हे दाखवणारे भुतांचे आत्मे आहेत; ते सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांना एकत्र करण्यास त्यांच्याकडे बाहेर जातात.


त्यांनी त्यांना इब्री भाषेत हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले.


कारण त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे ‘रक्त पाडले’ आणि तू ‘त्यांना रक्त पिण्यास’ लावले आहे; ह्यास ते पात्र आहेत.”


आणि तो ‘पृथ्वीच्या चार कोपर्‍यांतील गोग’ व ‘मागोग’ ह्या राष्ट्रांना ठकवण्यास व त्यांना लढण्यासाठी एकत्र करण्यास बाहेर येईल; त्यांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan