Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योएल 3:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 परमेश्वर सीयोनेतून गर्जना करतो; यरुशलेमेतून आपला शब्द ऐकवतो, आकाश व पृथ्वी थरथर कापत आहेत, तरी परमेश्वर आपल्या लोकांचा आश्रय आहे, इस्राएल लोकांचा दुर्ग आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 परमेश्वर देव सियोनेतून गर्जना करील, आणि आपला आवाज यरूशलेमेतून उंचावील. आकाश व पृथ्वी कापतील पण परमेश्वर आपल्या लोकांस सुरक्षित स्थान, आणि इस्राएलाच्या लोकांस तो दुर्ग होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 याहवेह सीयोनातून गर्जना करतील आणि यरुशलेमातून गडगडाट होईल; पृथ्वी व आकाश थरथर कापतील. परंतु याहवेह त्याच्या लोकांसाठी आश्रयस्थान आणि इस्राएल लोकांसाठी दुर्ग असतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योएल 3:16
31 Iomraidhean Croise  

परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडवणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करतो; तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरूज आहे.


परमेश्वर आपल्या लोकांना सामर्थ्य देईल; परमेश्वर आपल्या लोकांना शांतीचे वरदान देईल.


कारण तू माझा आश्रय, वैर्‍यापासून लपण्यास बळकट दुर्ग असा होत आला आहेस.


परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग आहे, त्यात नीतिमान धावत जाऊन निर्भय राहतो.


तो उच्च स्थानी वास करील, दुर्गम पहाड त्याचा दुर्ग होईल, त्याला अन्नाचा मुबलक पुरवठा होईल, त्याचे जल आटणार नाही;


आणखी तेथे आमच्यासाठी प्रतापी परमेश्वराचा निवास होईल; ते रुंद नदीनाल्याचे ठिकाण होईल; त्यात वल्ह्याच्या तारवाचा, मोठ्या जहाजाचा प्रवेश होणार नाही.


परमेश्वर वीराप्रमाणे निघेल; रणधुरंधराप्रमाणे तो आपल्या आवेशाचे उद्दीपन करील; तो प्रचंड शब्द करील; तो रणशब्द करील; तो आपल्या शत्रूंना आपला प्रभाव दाखवील.


मी आकाशाची स्थापना करावी, पृथ्वीचा पाया घालावा व ‘तू माझी प्रजा आहेस’ असे सीयोनेस म्हणावे म्हणून मी आपली वचने तुझ्या मुखात घातली; आपल्या हाताची छाया मी तुझ्यावर केली.”


हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, माझ्या दुर्गा, संकटसमयीच्या माझ्या आश्रया, पृथ्वीच्या दिगंतापासून राष्ट्रे तुझ्याकडे येऊन म्हणतील, “आमच्या पूर्वजांना खोट्या, निरर्थक व निरुपयोगी अशा वस्तूंचाच काय तो वतनभाग मिळाला.


तू मला भीतिप्रद होऊ नकोस, विपत्काळी तू माझा आश्रय आहेस.


कारण मी ईर्ष्येने, क्रोधाग्नीने तप्त होऊन बोललो आहे की खरोखर त्या दिवशी इस्राएल देशात मोठा भूकंप होईल;


ते परमेश्वरामागून जातील, तो सिंहासारखा गर्जेल, तो गर्जेल आणि त्यांचे पुत्र पश्‍चिमेकडून थरथर कापत येतील.


तो म्हणाला, “परमेश्वर सीयोनेतून गर्जना करतो, यरुशलेमेतून आपला शब्द ऐकवतो, मेंढपाळांची कुरणे शोक करतात व कर्मेलाचा माथा सुकून गेला आहे.”


सिंहाने गर्जना केली आहे; त्याला भिणार नाही असा कोण? प्रभू परमेश्वर बोलला आहे; संदेश दिल्यावाचून कोणाच्याने राहवेल?”


परमेश्वर चांगला आहे, विपत्काली तो शरणदुर्ग आहे; जे त्याच्यावर भाव ठेवतात त्यांना तो ओळखतो.


कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन, ही हलवून सोडीन;


मी सर्व राष्ट्रांना हलवून सोडीन म्हणजे सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तू येतील;1 आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


मी त्यांना परमेश्वराच्या ठायी बलवान करीन; ते त्याच्या नामाने येतील-जातील,” असे परमेश्वर म्हणतो.


मी यहूदाच्या घराण्यास शक्ती पुरवीन, योसेफाच्या घराण्याची मुक्तता करीन, देशात त्यांची वस्ती करीन; कारण त्यांच्यावर मी करुणा केली आहे; मी त्यांचा त्याग केलाच नाही असे ते होतील; कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे, मी त्यांचे ऐकेन.


आशा धरून राहिलेले बंदिवानहो, दुर्गाकडे परत या; आज मी हे जाहीर करतो की, मी तुला दुप्पट प्रतिफळ देईन.


त्या वेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलवली; परंतु त्याने दिलेले वचन आता असे आहे की, “‘आणखी एकदा मी’ केवळ ‘पृथ्वी’ नव्हे तर ‘आकाशही कापवीन.”’


त्याच घटकेस ‘मोठा भूमिकंप’ झाला. तेव्हा त्या नगराचा दहावा भाग ‘पडला,’ भूमिकंपाने सात हजार माणसे ठार झाली आणि बाकीची भयभीत होऊन त्यांनी ‘स्वर्गीय देवाचा’ गौरव केला.


तेव्हा देवाचे स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले, ‘त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश’ दृष्टीस पडला आणि ‘विजा’ चमकल्या, ‘गर्जना’ व मेघांचे गडगडाट झाले, भूमिकंप झाला व ‘मोठ्या गारांची वृष्टीही’ झाली.


तेव्हा ‘विजा चमकल्या, गर्जना व मेघांचे गडगडाट’ झाले. शिवाय इतका मोठा भूमिकंप झाला की ‘पृथ्वीवर’ मानव ‘झाल्यापासून’ इतका मोठा भूमिकंप ‘कधी झाला नव्हता.’


जो इस्राएलाचे केवळ वैभव आहे, तो खोटे बोलणार नाही; तो पस्तावा करणार नाही, त्याला पस्तावा व्हावा असा तो काही मानव नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan