Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योएल 2:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 वीरांप्रमाणे ते धावतात, योद्ध्यांप्रमाणे ते तट चढून जातात, ते प्रत्येक आपापल्या मार्गाने कूच करतात, ते आपली दिशा सोडत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 ते वीरासारखे धावतात, ते सैनिकासारखे तटांवर चढतात, ते प्रत्येक आपल्या मार्गात चालत जातात, आणि आपली रांग तोडीत नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 वीरांप्रमाणे ते हल्ला करतात; सैनिकांप्रमाणे ते तटाच्या भिंती चढतात. आपल्या रांगा न मोडता ते सरळ आगेकूच करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योएल 2:7
11 Iomraidhean Croise  

शौल व योनाथान प्रेमळ व मनमिळाऊ असत; जीवनात व मरणात त्यांचा वियोग झाला नाही. ते गरुडाहून वेगवान व सिंहाहून बलवान होते.


त्या दिवशी दावीद म्हणाला, “जो कोणी यबूशांना मारील त्याने नळाजवळून जाऊन दाविदाच्या जिवाचा द्वेष करणार्‍या त्या लंगड्या व आंधळ्या लोकांचा संहार करावा.” ह्यावर अशी म्हण पडली आहे की, ‘येथे आंधळे व लंगडे आहेत, घरात कोणाचा प्रवेश व्हायचा नाही.’


सैन्याची व्यूहरचना करणारे व सैन्याबरोबर लढाईस जाणारे आशेर वंशातले चाळीस हजार योद्धे आले.


खिंडारावर खिंडार पाडून तो मला भग्न करतो; तो वीराप्रमाणे माझ्यावर धावून आला आहे.


शय्यागृहातून वरासारखा तो बाहेर पडतो; तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो.


टोळांना कोणी राजा नाही, तरी ते टोळ्या करून एकदम उडतात.


तिच्या द्राक्षवेलांच्या रांगांत शिरा व नासधूस करा; तरी पूर्ण नासधूस करू नका. तिच्या फांद्या तोडून टाका. त्या परमेश्वराच्या नाहीत.


ते एकमेकांना रेटून चालत नाहीत; ते आपापल्या वाटेने जातात; समोर शस्त्रे असता ते जखम न होता त्यांतून पार जातात.


ते शहरातून इकडेतिकडे फिरतात, ते भिंतीवरून चालतात, ते चढून घरात शिरतात, चोरासारखे खिडक्यांतून प्रवेश करतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan