Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योएल 2:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्यांच्यापुढे अग्नी भस्म करत चालला आहे, त्यांच्यामागे ज्वाला जाळत चालली आहे, त्यांच्यापुढील प्रदेश एदेन बागेसारखा आहे, त्यांच्यामागील प्रदेश ओसाड रान आहे; त्यातून काहीच वाचून राहत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्यांच्यासमोर अग्नी प्रत्येक वस्तू नाश करत आहे, आणि त्याच्यामागे ज्वाला जाळीत चालली आहे, त्यांच्यासमोरची भूमी एदेनाच्या बागेसारखी आहे, पण त्यांच्यामागे निर्जन वाळवंट आहे. खरोखर, त्यांच्या तावडीतून काहीही सुटणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 त्यांच्यापुढे अग्नी विनाश करीत आहे, त्यांच्यामागे ज्वाला पेटली आहे. त्यांच्यापुढील प्रदेश एदेन बागेसारखा आहे, त्यांच्यामागील प्रदेश ओसाड वाळवंट आहे— त्यांच्या तावडीतून काहीच वाचू शकत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योएल 2:3
21 Iomraidhean Croise  

तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले; परमेश्वराने सदोम व गमोरा ह्यांचा नाश केला त्यापूर्वी सोअराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता.


परमेश्वर देवाने पूर्वेला एदेनात बाग लावली आणि तिच्यात आपण घडवलेल्या मनुष्याला ठेवले.


आमचा देव येत आहे, तो उगा राहायचा नाही; त्याच्यापुढे अग्नी ग्रासत चालला आहे. त्याच्याभोवती मोठे वादळ सुटले आहे.


त्याच्यापुढे अग्नी चालतो, आणि त्याच्या सभोवतालचे शत्रू जाळून टाकतो.


त्यांनी सर्व भूमी झाकून टाकल्यामुळे सार्‍या देशावर अंधार पडला; आणि त्यांनी भूमीवरील सर्व वनस्पती आणि गारांच्या वृष्टीतून वाचलेली सर्व फळेही खाऊन टाकली. सर्व मिसर देशात झाडांपैकी किंवा शेतातील वनस्पतींपैकी हिरवे म्हणून काही उरले नाही.


ते भूतल एवढे झाकून टाकतील की जमीन दिसेनाशी होईल; गारांच्या वृष्टीपासून निभावून जे काही शेष उरले असेल त्याचा ते फन्ना उडवतील; शेतात तुमची जितकी झाडे वाढत आहेत तीही ते खाऊन टाकतील;


ज्याने जगाचे रान केले, त्यातील नगरांचा विध्वंस केला, व आपल्या बंदिवानांना मुक्त करून घरी जाऊ दिले नाही तो हाच का पुरुष?’


निम्रीमाचे पाणी आटले आहे, गवत वाळून गेले आहे; झाडपाला सुकून गेला आहे; हिरवळ नाहीशी झाली आहे.


टोळ जसे सारे फस्त करतात तशी तुमची लूट हरण करतील, नाकतोडे धाड घालतात तसे तिच्यावर धाड घालतील.


पाहा, परमेश्वराने सीयोनेचे सांत्वन केले; तिच्या सर्व ओसाड स्थळांचे सांत्वन केले आहे; तिचे रान एदेनासारखे केले, तिचा निर्जल प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा केला; आनंद व उल्लास, उपकारस्मरण, गायनवादनाचा ध्वनी तिच्यामध्ये होत आहे.


दुष्टता अग्नीसारखी पेट घेते; ती काटेकुटे व काटेझुडपे खाऊन टाकते; वनातील झाडीतही ती पेट घेते; त्यांच्या धुराचा लोळ वर चढतो.


सेनाधीश परमेश्वराच्या क्रोधाने भूमी जळून खाक झाली आहे; लोकही जसे काय अग्नीला सरपण झाले आहेत; आपल्या भावालाही कोणी सोडत नाही.


ते तुझे पीक, तुझ्या मुलाबाळांचे अन्न खाऊन टाकतील; ते तुझी शेरडेमेंढरे, तुझी गुरेढोरे, खाऊन टाकतील; तुझ्या द्राक्षलता व अंजिरांची झाडे फस्त करतील; ज्या तटबंदीच्या नगरांवर तुझी भिस्त आहे त्यांना ते तलवारीने उद्ध्वस्त करतील.”


तेव्हा लोक म्हणतील, ‘ही भूमी वैराण झाली होती ती आता एदेन बागेसारखी झाली आहे. ओसाड, उजाड व उद्ध्वस्त झालेल्या नगरांची तटबंदी होऊन त्यांत वस्ती झाली आहे.’


प्रभू परमेश्वराने मला दाखवले तेव्हा पाहा, शासन करण्यास त्याने अग्नीला बोलावले, तेव्हा त्याने महासागर खाऊन टाकला व भूमीही तो खाऊन टाकणार होता.


कारण, पाहा, मी खास्द्यांची उठावणी करतो; ते उग्र व उतावळे राष्ट्र आहे; जी स्थले त्यांची नाहीत त्यांचा ताबा घ्यावा म्हणून ते पृथ्वीवर फिरत असतात.


“जी राष्ट्रे त्यांच्या ओळखीची नाहीत त्यांमध्ये मी त्यांना वावटळीने उडवीन. त्यांच्यामागे त्यांचा देश उजाड झाला आहे; त्यातून कोणी जातयेत नाही; कारण त्यांनी उत्तम भूमी वैराण केली आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan