Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योएल 2:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 वनपशूंनो, भिऊ नका, कारण वनातली कुरणे हिरवी होत आहेत, झाडे फळे देत आहेत, अंजिराचे झाड व द्राक्षीचा वेल आपले सत्त्व देत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 रानातल्या प्राण्यांनो, घाबरू नका. कारण रानातील कुरणांत हिरवळ उगवेल, झाडे त्यांचे फळे देतील, आणि अंजिराची झाडे व द्राक्षवेली आपले पूर्ण पीक देतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 वन्य पशूंनो तुम्ही घाबरू नका, कारण रानातील कुरणे हिरवीगार होत आहेत. झाडे आपली फळे देत आहेत; अंजिराची झाडे आणि द्राक्षवेली पुन्हा आपले सत्व देत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योएल 2:22
25 Iomraidhean Croise  

तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती ह्यापुढे तुला आपले सत्त्व देणार नाही, तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील.”


तुझे नीतिमत्त्व महान1 पर्वतांसारखे आहे; तुझे निर्णय अथांग महासागरासारखे आहेत; हे परमेश्वरा, तू मनुष्य व पशू ह्यांचा प्रतिपाळ करतोस.


रानांतली कुरणेही समृद्ध होतात; आणि डोंगरांना उल्लासाचे वेष्टन पडले आहे.


कुरणे कळपांनी झाकून गेली आहेत; खोरीही धान्याने सुशोभित होऊन गेली आहेत; ती मोठ्याने जयजयकार करतात व गातात.


भूमीने आपला उपज दिला आहे; देव, आमचा देव, आम्हांला आशीर्वाद देवो.


पाहा, परमेश्वराने सीयोनेचे सांत्वन केले; तिच्या सर्व ओसाड स्थळांचे सांत्वन केले आहे; तिचे रान एदेनासारखे केले, तिचा निर्जल प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा केला; आनंद व उल्लास, उपकारस्मरण, गायनवादनाचा ध्वनी तिच्यामध्ये होत आहे.


वृक्षांची फळे व शेतांचा उपज ह्यांची वृद्धी मी करीन, म्हणजे राष्ट्रांमध्ये तुम्हांला ह्यापुढे दुष्काळामुळे होणारी विटंबना भोगावी लागणार नाही.


तेव्हा लोक म्हणतील, ‘ही भूमी वैराण झाली होती ती आता एदेन बागेसारखी झाली आहे. ओसाड, उजाड व उद्ध्वस्त झालेल्या नगरांची तटबंदी होऊन त्यांत वस्ती झाली आहे.’


पण इस्राएलाचे पर्वतहो, तुमच्यावरील वृक्षांना फांद्या फुटून तुम्ही माझ्या इस्राएल लोकांना फळे द्याल असे लवकरच घडून येईल.


तर उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यांना कळत नाही अशी एक लाख वीस हजारांहून अधिक माणसे व पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय?”


त्या सर्व दिवसांत कोणी वीस मापे धान्याच्या राशीकडे गेला तर त्याच्या हाती दहा लागत; द्राक्षकुंडांतून पन्नास पात्रे भरून काढण्यास गेला तर त्याला वीसच मिळत.


शांततेचे बीजारोपण होत आहे; द्राक्षी आपले फळ देईल, भूमी आपला उपज देईल आणि आकाश आपले दहिवर देईल. ह्या अवशिष्ट लोकांना मी ह्या अवघ्यांचे वतन देईन.


म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही; तर वाढवणारा देव हाच काय तो आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan