Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योएल 2:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 अगे भूमी, भिऊ नकोस; उल्लास व हर्ष कर, कारण परमेश्वराने महत्कृत्ये केली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 हे भूमी, घाबरू नकोस. आनंद कर आणि उल्हसित हो, कारण परमेश्वराने महान गोष्टी केल्या आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 हे यहूदीय देशा, भिऊ नको; आनंद व उल्हास करा, निश्चितच याहवेहने महान कार्य केले आहेत!

Faic an caibideil Dèan lethbhreac




योएल 2:21
21 Iomraidhean Croise  

ह्या गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टान्तात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे : “अब्रामा, भिऊ नको. मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल.”


हे देवा, तुझे नीतिमत्त्व गगनापर्यंत पोहचले आहे. हे देवा, तू महत्कृत्ये केली आहेत; तुझ्यासारखा कोण आहे?


नद्या टाळ्या वाजवोत; पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गावोत;


अरण्य व रुक्ष भूमी ही हर्षतील; वाळवंट उल्लासेल व कमलाप्रमाणे फुलेल.


तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.


हे आकाशा, जयघोष कर, कारण परमेश्वराने हे केले आहे; अहो पृथ्वीच्या अधोभागांनो, हर्षनाद करा; अहो पर्वतांनो, हे वना, त्यातील प्रत्येक वृक्षा, तुम्ही जयजयकार करा; कारण परमेश्वराने याकोबाला उद्धरले आहे; तो इस्राएलाच्या ठायी आपला प्रताप प्रकट करतो.


भिऊ नकोस, तू लज्जित होणार नाहीस; घाबरू नकोस, तू फजीत होणार नाहीस; तुझ्या तारुण्यातील अप्रतिष्ठेचा तुला विसर पडेल; तुला आपल्या वैधव्याच्या बट्ट्याचे स्मरण ह्यापुढे होणार नाही.


तसे तुम्ही आनंदाने निघाल, शांतीने मिरवत जाल; पर्वत व टेकड्या तुमच्यापुढे जयघोष करतील; वनातील सर्व वृक्ष टाळ्या वाजवतील.


मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन.


परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की मी ऐकेन, मी आकाशाचे ऐकेन, आणि आकाश पृथ्वीचे ऐकेल;


उत्तरेकडून आलेल्यास तुमच्यापासून घालवून रुक्ष व वैराण प्रदेशात हाकून देईन; त्याची आघाडी पूर्व-समुद्रात व पिछाडी पश्‍चिम-समुद्रात हाकून देईन; त्याचा दुर्गंध, त्याची घाण वर येईल; कारण त्याने उन्मत्तपणाची कृत्ये केली आहेत.


तुम्ही भरपूर अन्न खाल आणि तृप्त व्हाल व ज्याने तुमच्यासाठी आश्‍चर्याची कृत्ये केली तो तुमचा देव परमेश्वर ह्याच्या नामाची स्तुती कराल; माझी प्रजा कधीही लज्जित होणार नाही.


त्याप्रमाणे ह्या दिवसांत यरुशलेमेचे व यहूदाच्या घराण्याचे हित करण्याचे मी योजले आहे; भिऊ नका;


देवाने पृथ्वीवर मानवाला निर्माण केले तेव्हापासून तुझ्या जन्मापर्यंत होऊन गेलेल्या काळात अशी मोठी गोष्ट कधी घडली होती किंवा ऐकण्यात आली होती काय, हे आकाशाच्या एका सीमेपासून दुसर्‍या सीमेपर्यंत विचारून पाहा.


आता स्थिर उभे राहा आणि परमेश्वर तुमच्यासमक्ष मोठी कृती करणार आहे ती पाहा.


मात्र तुम्ही परमेश्वराचे भय धरा व सत्याने व जिवेभावे त्याची सेवा करा; त्याने तुमच्यासाठी केवढी महत्कृत्ये केली आहेत ह्याचा विचार करा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan