Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योएल 2:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 परमेश्वराने आपल्या लोकांची विनवणी ऐकून म्हटले : “पाहा, मी तुम्हांला धान्य, नवा द्राक्षारस व तेल पाठवून देतो, त्यांनी तुम्ही तृप्त व्हाल; ह्यापुढे राष्ट्रांमध्ये मी तुम्हांला निंदास्पद करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 परमेश्वराने आपल्या लोकांस उत्तर देऊन म्हटले, “पाहा, मी तुमच्याकडे धान्य, नवा द्राक्षरस आणि तेल पाठवीन. तुम्ही त्यांनी तृप्त व्हाल, आणि ह्यापुढे, राष्ट्रात तुमची निंदा मी होऊ देणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 याहवेहने त्यांना उत्तर दिले: “मी तुम्हाला धान्य, नवा द्राक्षारस व जैतून तेल पाठवित आहे, जे तुम्हाला तृप्त करण्यास भरपूर आहे; पुन्हा कधीही मी तुम्हाला राष्ट्रांमध्ये उपहासाचा विषय होऊ देणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योएल 2:19
21 Iomraidhean Croise  

मी त्यांच्यासाठी नावाजण्याजोगी लागवड करीन, म्हणजे पुनरपि त्यांच्या देशावर दुष्काळ येऊन त्यांचा र्‍हास होणार नाही; त्यांना पुन्हा परराष्ट्रीय लोकांकडून अप्रतिष्ठा सोसावी लागणार नाही.


इत:पर मी तुला राष्ट्रांची निंदा ऐकवणार नाही, राष्ट्रांनी केलेली अप्रतिष्ठा तुला सोसावी लागणार नाही, तू आपल्या राष्ट्रांपुढे अडथळा ठेवणार नाहीस, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हांला मिळतील.


मग खळी गव्हाने भरून जातील, कुंडे नव्या द्राक्षारसाने व तेलाने उपळून जातील.


ते येऊन सीयोनेच्या माथ्यावर आनंदाने गातील; परमेश्वराची उपयुक्त वरदाने म्हणजे धान्य, नवा द्राक्षारस, ताजे तेल व गुरामेंढरांचे वत्स ह्यांकडे लोटतील; त्यांचा जीव भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होईल; ह्यापुढे ते म्लान होणार नाहीत.


शेताचे रान झाले आहे; भूमी रुदन करत आहे, कारण पिकाचा नाश झाला आहे; नवा द्राक्षारस आटला आहे; तेल क्षय पावले आहे.


तेथून मी तिचे द्राक्षीचे मळे तिला देईन; आशेचे द्वार व्हावे म्हणून मी तिला अखोर1 खिंड देईन; ती आपल्या तारुण्याच्या दिवसांतल्याप्रमाणे, ती मिसर देशातून निघून आली त्या दिवसांतल्याप्रमाणे, माझे बोलणे त्या ठिकाणी ऐकेल.


मी आपले मुख ह्यापुढे त्यांच्यापासून लपवणार नाही; कारण मी आपल्या आत्म्याची इस्राएल घराण्यावर वृष्टी केली आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


धान्याची मळणी तुम्ही द्राक्षाच्या हंगामापर्यंत करीत राहाल आणि द्राक्षांची तोडणी तुम्ही पेरणीच्या दिवसापर्यंत करीत राहाल; तुम्ही पोटभर अन्न खाल व आपल्या देशात सुरक्षित राहाल.


परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की मी ऐकेन, मी आकाशाचे ऐकेन, आणि आकाश पृथ्वीचे ऐकेल;


पृथ्वी, धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचे ऐकेल व ती इज्रेलाचे2 ऐकतील.


तर मी तुमच्या देशावर आगोटीचा पाऊस आणि वळवाचा पाऊस योग्य समयी पाठवीन; म्हणजे तुला आपले धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा साठा करता येईल.


परमेश्वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यांना अन्न दिले आहे असे वर्तमान तिला मवाब देशात कळले, तेव्हा त्या देशातून आपल्या दोन्ही सुनांसह परत जाण्यास ती निघाली.


मी तुमच्या सर्व मलिनतेपासून तुम्हांला मुक्त करीन. मी धान्यावर हुकूम करून त्याची विपुलता करीन, तुमच्यावर दुष्काळ आणणार नाही.


वृक्षांची फळे व शेतांचा उपज ह्यांची वृद्धी मी करीन, म्हणजे राष्ट्रांमध्ये तुम्हांला ह्यापुढे दुष्काळामुळे होणारी विटंबना भोगावी लागणार नाही.


शांततेचे बीजारोपण होत आहे; द्राक्षी आपले फळ देईल, भूमी आपला उपज देईल आणि आकाश आपले दहिवर देईल. ह्या अवशिष्ट लोकांना मी ह्या अवघ्यांचे वतन देईन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan