Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योएल 2:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तेव्हा परमेश्वराने आपल्या देशाविषयी ईर्ष्या धरली, तो आपल्या लोकांविषयी कळवळला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मग, तेव्हा परमेश्वराने देशासाठी, ईर्ष्या धरली, आणि त्याने आपल्या लोकांवर दया केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 मग याहवेहने आपल्या देशासाठी ईर्ष्या धरली, आणि ते आपल्या लोकांवर दया करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योएल 2:18
19 Iomraidhean Croise  

कारण यरुशलेमेतून शेष निघेल व सीयोन डोंगरातून निभावलेले निघतील. परमेश्वराची आस्था हे सिद्धीस नेईल.


जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो, तसा परमेश्वर आपले भय धरणार्‍यांवर ममता करतो.


परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणार्‍यांवर युगानुयुग असते, आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्यांच्या पुत्रपौत्रांना घडतो;


कारण यरुशलेमेतून अवशेष निघेल व सीयोन डोंगरातून निभावलेले निघतील; सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.


परमेश्वर वीराप्रमाणे निघेल; रणधुरंधराप्रमाणे तो आपल्या आवेशाचे उद्दीपन करील; तो प्रचंड शब्द करील; तो रणशब्द करील; तो आपल्या शत्रूंना आपला प्रभाव दाखवील.


परदेशचे लोक तुझे कोट बांधत आहेत, त्यांचे राजे तुझी सेवा करत आहेत; कारण मी क्रोधाविष्ट होऊन तुला ताडन केले तरी आता मी प्रसन्न होऊन तुझ्यावर दया केली आहे.


तू स्वर्गातून अवलोकन कर, आपल्या पवित्रतेच्या व प्रतापाच्या निवासस्थानातून पाहा; तुझी आस्था व तुझे पराक्रम कोठे आहेत? तुझ्या पोटातला कळवळा व तुझी करुणा माझ्या बाबतीत संकुचित झाली आहे.


त्यांच्या सर्व दु:खाने तो दु:खी झाला, त्याची प्रत्यक्षता दर्शवणार्‍या दिव्यदूताने त्यांचे तारण केले; त्याने आपल्या प्रीतीने व आपल्या करुणेने त्यांना उद्धरले; पूर्वीचे सर्व दिवस त्याने त्यांचे लालनपालन केले.


एफ्राईम माझा प्रिय पुत्र आहे ना? तो माझा लाडका मुलगा आहे ना? मी वारंवार त्याच्याविरुद्ध बोलतो तरी मी त्याची आठवण करीतच असतो; म्हणून माझी आतडी त्याच्यासाठी कळवळतात; मी त्याच्यावर दया करीनच करीन, असे परमेश्वर म्हणतो.


आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही.


मग माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत मला म्हणाला, ‘असे जाहीर कर की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, यरुशलेम व सीयोन ह्यांविषयी मी अतिशय ईर्ष्यायुक्त झालो आहे.


“सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सीयोनेसंबंधाने मी अतिशय ईर्ष्यायुक्त झालो आहे; तिच्याकरता संतप्त आवेशाने मी ईर्ष्यायुक्त झालो आहे.


मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले.


त्यांनी अन्य देवांच्या मागे लागून त्याला ईर्ष्येस पेटवले. अमंगळ कृत्ये करून त्याला चीड आणली.


आपल्या लोकांचा आश्रय तुटला आहे, बद्ध किंवा मुक्त असा कोणी उरला नाही, हे परमेश्वर पाहील तेव्हा तो त्यांचा न्याय करील, त्याला आपल्या सेवकाचा कळवळा येईल.


राष्ट्रांनो, त्याच्या प्रजेचा जयजयकार करा; कारण तो आपल्या सेवकांच्या रक्तपाताचा बदला घेईल, तो आपल्या विरोधकांचा सूड उगवील, तो आपला देश व आपली प्रजा ह्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त करील.”


पाहा, ‘ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो.’ तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे; ह्यावरून ‘प्रभू फार कनवाळू व दयाळू’ आहे हे तुम्हांला दिसून आले.


मग ते आपल्यातील परके देव टाकून देऊन परमेश्वराची सेवा करू लागले. इस्राएलांचे हाल पाहून त्याच्या मनाला खेद झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan