Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योएल 2:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 परमेश्वर आपल्या सैन्यापुढे गर्जना करतो; कारण त्याचा तळ विस्तीर्ण आहे; त्याचा हुकूम बजावणारा बलवान आहे; परमेश्वराचा दिवस मोठा व फार भयंकर आहे; त्या वेळी कोण टिकेल?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 परमेश्वर आपल्या सैन्यापुढे आपला आवाज उंचावतो, त्याचे योद्धे खूप असंख्य आहेत, कारण जो कोणी त्याची आज्ञा आमलात आणतो तो बलशाली आहे. कारण परमेश्वराचा दिवस हा मोठा आणि फार भयंकर आहे. त्यामध्ये कोण टिकू शकेल?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 याहवेह आपल्या सैन्यापुढे गर्जना करीत चालतात; त्यांचे सैन्य असंख्य आहेत, आणि त्यांची आज्ञा मानणारे बलवान सैन्य आहे. याहवेहचा दिवस महान आहे; अति भयंकर दिवस आहे. त्यास कोण सहन करू शकेल?

Faic an caibideil Dèan lethbhreac




योएल 2:11
30 Iomraidhean Croise  

त्याने आपले बाण सोडून त्यांची दाणादाण केली; त्याने विजा पाडून त्यांची त्रेधा उडवली.


राष्ट्रे खवळली, राज्ये डळमळली; त्याने गर्जना केली तो पृथ्वी विरघळून गेली.


तू उच्च स्थानी आरोहण केले आहेस; तू पाडाव केलेल्यांना कैद करून नेले आहेस; मनुष्यांमध्ये, बंडखोरांमध्येही तुला नजराणे मिळाले आहेत, ह्यासाठी की, हे परमेशा, देवा, तू तेथे वास करावास.


ऐका, एखाद्या मोठ्या राष्ट्रासारखा गोंगाट डोंगरावर होत आहे! एकत्र झालेल्या राष्ट्रसमूहाचा गलबला होत आहे! सेनाधीश परमेश्वर युद्धासाठी सैन्याची पाहणी करीत आहे.


परमेश्वर वीराप्रमाणे निघेल; रणधुरंधराप्रमाणे तो आपल्या आवेशाचे उद्दीपन करील; तो प्रचंड शब्द करील; तो रणशब्द करील; तो आपल्या शत्रूंना आपला प्रभाव दाखवील.


त्या दिवशी असे होईल की मिसरी नदीच्या फाट्यांच्या शेवटांस असलेल्या माशा व अश्शूर देशात असलेल्या मधमाशा ह्यांना परमेश्वर शीळ घालून बोलावील.


ह्यास्तव तू त्यांना ह्या सर्व वचनांचा संदेश सांग; त्यांना असे सांग की, ‘परमेश्वर उच्च स्थलावरून गर्जना करील; तो आपल्या पवित्र निवासातून शब्द उच्चारील; तो आपल्या कळपावर गर्जना करील; द्राक्षे तुडवणार्‍यांप्रमाणे तो पृथ्वीच्या सर्व रहिवाशांविरुद्ध आरोळी करील.


हायहाय! तो महादिन आहे; त्याच्यासमान दुसरा कोणता नाही; तो याकोबाचा क्लेशसमय आहे तरी त्यातून त्याचा निभाव होईल.


त्यांचा उद्धारकर्ता समर्थ आहे; सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे. तो त्यांच्या पक्षाने लढेलच, म्हणजे मग तो पृथ्वीला विसावा देईल, पण बाबेलच्या रहिवाशांना घाबरे करील.


मी तुझा समाचार घेईन त्या दिवशी तुझे हृदय टिकाव धरील काय? तुझे हात दृढ राहतील काय? मी परमेश्वर हे जे बोललो आहे ते मी करीनच.


त्या दिवसाबद्दल हायहाय करा! भयंकर दिवस! परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे, सर्वसमर्थाकडून विनाशमय असा तो येत आहे.


माझ्या देशावर बळकट व असंख्य लोक आले आहेत; त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे आहेत; त्यांना सिंहिणीचे सुळे आहेत.


सीयोनात कर्णा वाजवा, माझ्या पवित्र पर्वतावर नौबत वाजवा; देशात राहणारे सर्व थरथर कापोत, कारण, परमेश्वराचा दिवस येत आहे, तो येऊन ठेपला आहे.


अंधाराचा व औदासिन्याचा दिवस, मेघमय अभ्राच्छादित दिवस येत आहे. डोंगरावर प्रभातेचा प्रकाश पसरतो तसे महान व बलवान राष्ट्र येत आहे; पूर्वी कधीच असा प्रकाश झाला नाही, पुढे पिढ्यानपिढ्या असा कधी होणार नाही.


मी तुमच्यावर पाठवलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडींनी येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, अधाशी टोळ व कुरतडणारे टोळ ह्यांनी ज्या वर्षांचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हांला भरपाई करून देईन.


परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल.


लोकांच्या झुंडी, निर्णयाच्या खोर्‍यात लोकांच्या झुंडी आहेत. कारण निर्णयाच्या खोर्‍यात परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे.


परमेश्वर सीयोनेतून गर्जना करतो; यरुशलेमेतून आपला शब्द ऐकवतो, आकाश व पृथ्वी थरथर कापत आहेत, तरी परमेश्वर आपल्या लोकांचा आश्रय आहे, इस्राएल लोकांचा दुर्ग आहे.


तो म्हणाला, “परमेश्वर सीयोनेतून गर्जना करतो, यरुशलेमेतून आपला शब्द ऐकवतो, मेंढपाळांची कुरणे शोक करतात व कर्मेलाचा माथा सुकून गेला आहे.”


परमेश्वराचा दिवस यावा अशी जे इच्छा बाळगतात, त्यांना धिक्कार असो! परमेश्वराचा दिवस येण्याची तुम्ही का इच्छा करता? तो अंधकारमय आहे, प्रकाशमय नव्हे.


परमेश्वराचा दिवस अंधकारमय असणार, प्रकाशमय नसणार, तो अगदी काळोखाचा असणार; त्यात मुळीच चमक नसणार असे नव्हे का?


कारण परमेश्वराचा दिवस सर्व राष्ट्रांना समीप येऊन ठेपला आहे; तू केलेस तसे तुला करतील; तुझी करणी तुझ्याच डोक्यावर उलटेल.


त्याच्या रागापुढे कोण टिकणार? त्याच्या क्रोधाच्या संतापापुढे कोण उभा राहणार? त्याच्या संतापाचा वर्षाव अग्नीसारखा होतो, त्याच्यापुढे खडक फुटून त्यांचे तुकडे होतात.


त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. “कारण तो धातू गाळणार्‍याच्या अग्नीसारखा, परटाच्या खारासारखा आहे;


तो आपला काव्यरूपी संदेश पुढे चालवून म्हणाला, “हाय! हाय! देव हे घडवून आणील तेव्हा कोणाचा जीव वाचेल?


कारण आज्ञाध्वनी, आद्यदिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल; आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील.


ह्यामुळे तिच्या पीडा म्हणजे मरण, दुःख व दुष्काळ ‘एका दिवशीच येतील,’ आणि ती अग्नीत जाळून टाकली जाईल; कारण तिचा ‘न्यायनिवाडा करणारा प्रभू’ देव ‘सामर्थ्यवान’ आहे.”


कारण त्याच्या ‘क्रोधाचा मोठा दिवस’ आला आहे, ‘आणि कोणाच्याने टिकाव धरवेल?”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan