Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योएल 1:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 गुरेढोरे कशी धापा टाकत आहे! बैलांचे कळप घाबरले आहेत, कारण त्यांना चारा नाही; मेंढरांचे कळपही पिडले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 प्राणी कसे कण्हत आहेत! गुरांचे कळप घाबरले आहेत. त्यांना खाण्यास कुरणे नाहीत. मेंढ्यांचे कळपसुद्धा पीडले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 गुरे कशी कण्हत आहेत! शेरडामेंढरांचे कळप व्याकूळ झाले आहेत, कारण त्यांना चरण्यासाठी कुरणेच नाहीत; मेंढ्यांचे कळप विव्हळत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योएल 1:18
10 Iomraidhean Croise  

अहाब ओबद्यास म्हणाला, “देशात फिरून पाण्याचे झरे, नाले असतील ते सर्व शोधून पाहा; घोडे व खेचरे ह्यांचा जीव वाचवण्यापुरते गवत कोठेतरी कदाचित मिळेल व अशाने आमची सगळी जनावरे मरणार नाहीत.”


शलमोन राजा व त्याच्याजवळ जमलेली सर्व इस्राएल मंडळी ह्यांनी कोशापुढे शेरडामेंढरांचे व गुराढोरांचे बली इतके अर्पण केले की त्यांच्या संख्येची मोजदाद करता आली नाही.


देशाने कोठवर शोक करावा? सर्व देशातली वनस्पती कोठवर सुकणार? त्यात वस्ती करणार्‍यांच्या दुष्टतेने पशुपक्षी नष्ट झाले आहेत, कारण ते म्हणतात, “आमचा अंत तो पाहणार नाही.”


ह्यामुळे देश शोक करीत आहे व त्यातील सर्व रहिवासी व त्यांच्याबरोबर वनपशू व आकाशातील पक्षी म्लान झाले आहेत; समुद्रातले मासेही नाहीतसे झाले आहेत.


वनपशूंनाही तुझा सोस लागला आहे; तुझा सोस लागून ते धापा टाकत आहेत; पाण्याचे ओढे सुकून गेले आहेत; अग्नीने रानातील कुरणे खाऊन टाकली आहेत.


तो म्हणाला, “परमेश्वर सीयोनेतून गर्जना करतो, यरुशलेमेतून आपला शब्द ऐकवतो, मेंढपाळांची कुरणे शोक करतात व कर्मेलाचा माथा सुकून गेला आहे.”


अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाहीतसे झाले, व गोठ्यात गुरेढोरे न उरली,


म्हणून तुमच्यामुळे आकाशाने दहिवर आवरून धरले आहे, भूमीने आपला उपज आवरून धरला आहे.


कारण आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan