Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योएल 1:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 शेताचे रान झाले आहे; भूमी रुदन करत आहे, कारण पिकाचा नाश झाला आहे; नवा द्राक्षारस आटला आहे; तेल क्षय पावले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 शेतांचा नाश झाला आहे. आणि भूमी रडते. कारण धान्याचा नाश झाला आहे, नवा द्राक्षरस सुकून गेला आहे आणि तेल नासले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 शेतांची धूळधाण झाली आहेत, भूमी कोरडी पडली आहे; धान्याचा नाश झाला आहे, नवीन द्राक्षारस सुकला आहे, जैतून तेल समाप्त झाले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योएल 1:10
19 Iomraidhean Croise  

तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती ह्यापुढे तुला आपले सत्त्व देणार नाही, तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील.”


निम्रीमाचे पाणी आटले आहे, गवत वाळून गेले आहे; झाडपाला सुकून गेला आहे; हिरवळ नाहीशी झाली आहे.


बाहेर रस्त्यात द्राक्षारसास्तव ओरड चालली आहे, सर्व उत्सव मावळला आहे, पृथ्वीचा हर्ष लोपला आहे;


नवा द्राक्षारस शोकाकुल झाला आहे, द्राक्षी करपून गेली आहे, हर्षित मनाचे सर्व जन उसासे टाकत आहेत.


त्यांनी ते ओसाड केले आहे; ते ओसाड होऊन माझ्यापुढे विलाप करीत आहे; सगळा देश ओसाड झाला आहे, कारण कोणालाही त्याची पर्वा वाटली नाही.


देशाने कोठवर शोक करावा? सर्व देशातली वनस्पती कोठवर सुकणार? त्यात वस्ती करणार्‍यांच्या दुष्टतेने पशुपक्षी नष्ट झाले आहेत, कारण ते म्हणतात, “आमचा अंत तो पाहणार नाही.”


फळबागेतून, मवाब देशातून आनंद व हर्ष नाहीसा केलेला आहे; द्राक्षकुंडांत द्राक्षारस नाही असे मी केले आहे; हर्षनाद करून द्राक्षे कोणी तुडवणार नाही; हर्षनाद होईल तो द्राक्षे तुडवणार्‍यांचा नसणार.


ह्यामुळे देश शोक करीत आहे व त्यातील सर्व रहिवासी व त्यांच्याबरोबर वनपशू व आकाशातील पक्षी म्लान झाले आहेत; समुद्रातले मासेही नाहीतसे झाले आहेत.


खळे व द्राक्षकुंड ह्यांनी त्यांचा निर्वाह होणार नाही, नवा द्राक्षारस तिला दगा देईल.


द्राक्षीचा वेल वाळला आहे, अंजिराचे झाड कोमेजून गेले आहे; डाळिंब, ताड व सफरचंद अशी मळ्यातील सर्व झाडे सुकून गेली आहेत; मानवजातीचा आनंद आटला आहे.


अहो मद्यप्यांनो, जागे व्हा आणि रडा; द्राक्षारस पिणार्‍यांनो, तुम्ही सर्व नव्या द्राक्षारसाकरता विलाप करा, कारण तो तुमच्या तोंडून काढून घेतला आहे.


परमेश्वराने आपल्या लोकांची विनवणी ऐकून म्हटले : “पाहा, मी तुम्हांला धान्य, नवा द्राक्षारस व तेल पाठवून देतो, त्यांनी तुम्ही तृप्त व्हाल; ह्यापुढे राष्ट्रांमध्ये मी तुम्हांला निंदास्पद करणार नाही.


तुमची मेहनत व्यर्थ जाईल, कारण तुमची भूमी उपज द्यायची नाही व देशातील झाडे फळे देणार नाहीत.


अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाहीतसे झाले, व गोठ्यात गुरेढोरे न उरली,


मी देशावर अवर्षण बोलावले आहे; पर्वतांवर, पिकांवर, द्राक्षारसावर, तेलावर, भूमीच्या उपजावर, माणसांवर, पशूंवर व तुमच्या हातच्या सर्व कमाईवर अवर्षण बोलावले आहे.”


पाहा, मी तुमच्या शेतातले बी निर्जीव करीन,1 तुमच्या यज्ञपशूची विष्ठा तुमच्या मुखांना फाशीन; लोक विष्ठेबरोबर तुम्हांलाही फेकून देतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan