Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




इय्योब 1:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 सात हजार मेंढरे, तीन हजार उंट, बैलांच्या पाचशे जोड्या व पाचशे गाढवी एवढे त्याचे धन होते आणि त्याचा परिवार फार मोठा होता; असा तो पूर्व देशांतल्या सर्व लोकांत थोर होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 ईयोबाजवळ सात हजार मेंढरे, तीन हजार उंट, बैलांच्या पाचशे जोड्या, आणि पाचशे गाढवी होती. त्याच्याकडे पुष्कळ चांगले सेवकही होते. पूर्वेमधील सर्व लोकांमध्ये तो अतिशय थोर पुरूष होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 त्याच्याजवळ सात हजार मेंढ्या, तीन हजार उंट, पाचशे बैलजोड्या, पाचशे गाढवे आणि पुष्कळ नोकरचाकरही होते. तो पूर्वेकडील सर्व लोकात अत्यंत महान पुरुष होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




इय्योब 1:3
34 Iomraidhean Croise  

तिच्यामुळे त्याने अब्रामाचे बरे केले, आणि त्याला मेंढरे, बैल, गाढव, दास, दासी, गाढवी व उंट मिळाले.


आपली बायको साराय, पुतण्या लोट, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे घेऊन अब्राम कनान देशात जायला निघाला व कनान देशात ते जाऊन पोहचले.


त्यांना एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना; कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यांना एकत्र राहता येईना.


परमेश्वराने माझ्या धन्याचे फार कल्याण केले आहे; तो थोर झाला आहे; त्याने त्याला गुरे, मेंढरे, सोने, रुपे, दासदासी, उंट व गाढवे दिली आहेत.


पण अब्राहामाच्या उपपत्नी होत्या. त्यांच्या मुलांना त्याने देणग्या देऊन आपल्या हयातीतच आपला मुलगा इसहाक ह्याच्यापासून वेगळे करून पूर्वेकडे पूर्वदेशी लावून दिले.


मग याकोब मार्गस्थ होऊन पूर्वेकडील लोकांच्या प्रदेशात जाऊन पोहचला.


दोनशे शेळ्या व वीस बोकड, दोनशे मेंढ्या व वीस एडके,


हे केल्यास त्यांचे कळप, मालमत्ता आणि त्यांची सगळी जनावरे ही आपली नाही का होणार? एवढे त्यांचे म्हणणे मान्य करू या, म्हणजे ते आपल्यात वस्ती करून राहतील.”


त्या श्रीमंत माणसाची मेंढरे व गुरे विपुल होती;


शलमोनाचे शहाणपण सर्व पूर्वदेशनिवासी आणि मिसरी ह्यांच्याहून अधिक होते.


अश्शूराच्या राजाला देण्यासाठी मनहेमाने इस्राएलातल्या मोठमोठ्या धनवान लोकांकडून प्रत्येकी पन्नास शेकेल चांदी काढली. मग अश्शूरचा राजा परत गेला, देशात थांबला नाही.


मवाबाच्या राजा मेशा हा मेंढरांचे कळप बाळगून होता; तो इस्राएलाच्या राजाला एक लाख कोकरांची व एक लाख एडक्यांची लोकर खंडणी म्हणून देत असे.


उंटांवर ओबील इश्माएली हा होता; गाढवांवर येहद्या मेरोनोथी हा होता;


त्याची पुष्कळ जनावरे होती म्हणून त्याने जंगलात, तळवटीत व मैदानांत बुरूज बांधले व पुष्कळ हौद खोदले. पहाडात व कर्मेलात त्याचे शेतकरी व द्राक्षाचे मळेकरी असत, कारण त्याला शेतीची फार आवड होती.


त्याने नगरे वसवली; शेरडेमेंढरे व गाईबैल ह्यांचे विपुल धन संपादले. परमेश्वराने त्याला बहुत धन दिले.


तो, त्याचे घर व त्याचे सर्वस्व ह्याभोवती तू कुंपण घातले आहेस ना? तू त्याच्या हाताला यश दिले आहेस ना? व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना?


त्याचे पुत्र पाळीपाळीने एकमेकांच्या घरी भोजनसमारंभ करीत, व त्या वेळी आपल्या तिन्ही बहिणींना पंक्तीला बोलावीत.


तुम्ही म्हणता, ‘सरदाराचा वाडा कोठे राहिला आहे? दुष्ट राहत असत तो डेरा कोठे टिकला आहे?’


मी त्यांचा मार्गदर्शक होई व त्यांच्यामध्ये अग्रस्थानी बसे; सैन्यात जसा राजा, शोकग्रस्तांत जसा समाधान करणारा, तसा मी त्यांच्यामध्ये असे.”


जर माझे धन बहुत आहे, माझ्या हातांनी फार कमाई केली आहे, ह्याचा मी आनंद केला असता,


मी पावलापावलाचा हिशोब त्याला दिला असता; त्याच्याजवळ मी सरदारासारखा गेलो असतो.


ईयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने ईयोबाच्या दुःखाचा परिहार केला; पूर्वी ईयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली.


परमेश्वराने ईयोबाचे उत्तरवय पूर्ववयाहून अधिक सुखसंपन्न केले; चौदा हजार मेंढरे, सहा हजार उंट, बैलांच्या हजार जोड्या आणि हजार गाढवी इतक्यांचा तो धनी झाला.


परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.


केदार व हासोराची संस्थाने ह्यांच्यावर बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने मारा केला त्याविषयी : परमेश्वर म्हणतो, उठा, केदारावर चढाई करा! पूर्वेच्या लोकांचा नाश करा!


बलाम काव्यरूपाने आपला संदेश देऊ लागला, “बालाकाने मला अरामाहून, मवाबाच्या राजाने मला पूर्वेकडील डोंगरवटीहून बोलावून आणले आहे :


मग असे होई की, शेते पेरल्यावर मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडचे रहिवासी त्यांच्यावर चढाई करत आणि ते त्यांच्यावर हल्ला करत;


कारण ते आपले पशू व डेरे घेऊन चढाई करत आणि टोळधाडीप्रमाणे उतरत. ते व त्यांचे उंट अगणित होते; अशा प्रकारे ते देश उजाड करायला येत असत.


त्या खोर्‍यात मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडचे लोक टोळधाडीप्रमाणे पसरले होते. त्यांचे उंट समुद्रकिनार्‍यावरील वाळूप्रमाणे अगणित होते.


जेबह व सलमुन्ना हे कर्कोर येथे होते आणि त्यांच्याबरोबर सुमारे पंधरा हजार सैन्य होते; पूर्वेकडील रहिवाशांच्या सर्व सैन्यापैकी तेवढेच उरले होते; कारण एक लक्ष वीस हजार धारकरी पुरुष पतन पावले होते.


मावोन येथे एक मनुष्य होता, तो आपला व्यवहार कर्मेल येथे चालवत असे; तो माणूस मोठा मातबर असून त्याची तीन हजार मेंढरे व एक हजार बकर्‍या होत्या; तो कर्मेलात आपल्या मेंढ्यांची लोकर कातरत होता.


दाविदाने त्या प्रदेशावर मारा केला आणि तेथल्या कोणाही स्त्रीपुरुषास जिवंत सोडले नाही, आणि तेथली शेरडेमेंढरे, गाईबैल, गाढवे, उंट आणि वस्त्रप्रावरणे घेऊन तो परत आखीशाकडे गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan