योहान 8:44 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 तुम्ही आपला पिता सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या पित्याच्या वासनांप्रमाणे करू पाहता. तो प्रारंभापासून मनुष्य घात करणारा होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा पिता आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)44 तुम्ही तुमचा बाप सैतान ह्याच्यापासून जन्मला आहात आणि तुम्ही तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यापुढे टिकला नाही. त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो, तेव्हा तो त्याच्या स्वभावाप्रमाणे बोलतो; कारण तो लबाड असून सर्व असत्याचा बाप आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 तुम्ही तुमचा पिता सैतानापासून आहात आणि तुमच्या पित्याची इच्छा पूर्ण करावयास पाहता. तो आरंभापासून घात करणारा व सत्याला धरून न राहणारा आहे, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा लबाड बोलतो तेव्हा तो त्याची जन्मभाषा बोलतो, कारण तो लबाड आहे व लबाडांचा पिता आहे. Faic an caibideil |