Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 8:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, दोघा मनुष्यांची साक्ष खरी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, दोघा मनुष्यांची साक्ष खरी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 तुमच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, दोघा मनुष्यांची साक्ष खरी असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 तुमच्या नियमशास्त्रात लिहिले आहे की दोन साक्षीदारांची साक्ष खरी मानावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 8:17
13 Iomraidhean Croise  

आणि दोन अधम माणसे त्याच्यासमोर बसवा; ‘त्याने देवाचा व राजाचा धिक्कार केला’ अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी; मग गावाबाहेर नेऊन त्याला मरेपर्यंत दगडमार करावा.”


कोणी एखाद्या मनुष्याचा खून केला तर साक्षीदारांच्या साक्षीवरून त्या खून करणार्‍याला जिवे मारावे; पण एकाच साक्षीदाराच्या साक्षीवरून कोणाला जिवे मारू नये.


परंतु त्याने जर ऐकले नाही तर तू आणखी एका-दोघांस आपणाबरोबर घे; अशासाठी की, ‘दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द शाबीत व्हावा.’


येशूने त्यांना म्हटले, “‘तुम्ही देव आहात असे मी म्हणालो’ हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय?”


तथापि ‘विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला’ हे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते.


ही माझी तुमच्याकडे येण्याची तिसरी खेप. ‘दोघा अथवा तिघा साक्षीदारांच्या मुखाने प्रत्येक गोष्ट प्रस्थापित होते.’


ह्यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरवले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचवणारे बालरक्षक होते.


जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हायला पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय, हे मला सांगा.


ज्याला जिवे मारायचे असेल त्याला दोघा अथवा तिघा साक्षीदारांच्या साक्षीवरून जिवे मारावे; एकाच साक्षीदाराच्या साक्षीवरून त्याला जिवे मारू नये.


एखाद्याने काही गुन्हा किंवा अन्याय केला आणि त्याने केलेल्या त्या अपराधाबद्दल त्याच्याविरुद्ध एकच साक्षीदार पुढे आला तर चालणार नाही; दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या साक्षीनेच कोणताही आरोप शाबीत व्हावा.


मोशेच्या नियमशास्त्राचा कोणी भंग केला तर त्याच्यावर दया न होता ‘त्याला दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरणदंड होतो.’


आपण माणसांची साक्ष स्वीकारतो, पण तिच्यापेक्षा देवाची साक्ष मोठी आहे; जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली तीच ही त्याची साक्ष आहे.


माझे दोन साक्षी ह्यांना मी अधिकार देईन आणि ते तरट पांघरून एक हजार दोनशे साठ दिवस संदेश सांगतील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan