Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 7:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 ‘दाविदाच्या वंशाचा’ व ज्या ‘बेथलेहेमात’ दावीद होता त्या गावातून ख्रिस्त ‘येणार’ असे शास्त्रात सांगितले नाही काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 दाविदाच्या वंशाचा आणि ज्या गावात दावीद होता त्या बेथलेहेमातून ख्रिस्त येईल अस शास्त्रलेख म्हणत नाही काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

42 दावीदच्या वंशाचा व ज्या बेथलहेममध्ये दावीद राहत होता. त्या नगरातून ख्रिस्त येणार, असे धर्मशास्त्रात सांगितले नाही काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 शास्त्रलेख असे सांगत नाही का, दावीदाच्या कुळात, बेथलेहेममध्ये, जिथे दावीद राहिला तिथून ख्रिस्त येईल?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 7:42
17 Iomraidhean Croise  

सल्मा हा बेथेलहेमाचा बाप; हारेफ हा बेथगादेराचा बाप.


परमेश्वराने दाविदाजवळ खरी शपथ वाहिली आहे; तो माघार घेणार नाही; ती शपथ अशी की, “मी तुझ्या पोटच्या फळांतले तुझ्या राजासनावर बसवीन;


‘मी तुझ्या संततीची परंपरा सर्वकाळ चालवीन, तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थिर स्थापीन;” (सेला)


इशायाच्या बुंध्याला धुमारा फुटेल; त्याच्या मुळांतून फुटलेली शाखा फळ देईल;


परमेश्वर म्हणतो, पाहा, मी दाविदाकरता एक नीतिमान अंकुर उगववीन; तो राजा होऊन राज्य करील, तो सुज्ञतेने वागेल, देशात न्यायनीतीचा अवलंब करील, असे दिवस येत आहेत.


हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.


अब्राहामाचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त, त्याची वंशावळी.


ते त्याला म्हणाले, “यहूदीयातील बेथलेहेमात; कारण संदेष्ट्याच्या द्वारे असे लिहिले आहे की,


‘हे यहूदाच्या प्रांता, बेथलेहेमा, तू यहूदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही; कारण माझ्या इस्राएल लोकांचा प्रतिपाळ करील असा सरदार तुझ्यातून निघेल.”’


ती ही की, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे.


योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालीलातील नासरेथ गावाहून वर यहूदीयातील दाविदाच्या बेथलहेम गावी गेला,


तरी हा कोठला आहे हे आम्हांला ठाऊक आहे; पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठला आहे हे कोणालाही कळणार नाही.”


मग परमेश्वराने शमुवेलाला म्हटले, “मी शौलाला इस्राएलाच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करीत राहणार? शिंगात तेल भरून चल; मी तुला इशाय बेथलेहेमकर ह्याच्याकडे पाठवतो; कारण मी त्याच्या एका पुत्राला माझ्याकरता राजा निवडले आहे.”


तेव्हा एका तरुण सेवकाने उत्तर दिले, पाहा, मी बेथलेहेमकर इशाय ह्याचा एक पुत्र पाहिला आहे; तो वादनकलेत निपुण असून प्रबळ व युद्धकुशल वीर आहे, तसाच तो चांगला वक्ता असून रूपवान आहे; आणि परमेश्वर त्याच्याबरोबर आहे.”


परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे शमुवेलाने केले व तो बेथलेहेमास गेला. तेव्हा त्या नगरातले वडील जन थरथर कापत त्याला भेटायला आले, व त्यांनी त्याला विचारले, “आपण स्नेहभावाने आला आहात काय?”


शौलाने त्याला विचारले, “हे तरुणा, तू कोणाचा पुत्र?” तेव्हा दावीद म्हणाला, “आपला दास बेथलेहेमकर इशाय ह्याचा मी पुत्र.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan