Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 7:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 पाहा, तो उघडउघड बोलतो व ते त्याला काही म्हणत नाहीत. हा ख्रिस्त आहे, हे अधिकार्‍यांनी खरोखरच ओळखले आहे काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 पाहा, तो उघडपणे बोलत आहे आणि ते त्यास काहीच बोलत नाहीत. हाच ख्रिस्त आहे, हे खरोखर अधिकार्‍यांना कळले आहे काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

26 पाहा, तो उघडपणे बोलतो व ते त्याला काही म्हणत नाहीत. हा ख्रिस्त आहे, हे अधिकाऱ्यांनी खरोखरच ओळखले आहे काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 हा तर येथे जाहीरपणे बोलत आहे आणि ते एक शब्दही बोलत नाहीत. तर मग हाच ख्रिस्त आहे अशी आपल्या पुढार्‍यांना खात्री पटली आहे का?

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 7:26
21 Iomraidhean Croise  

कोणी पाठीस लागले नसता दुर्जन पळतात, पण नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात.


पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही, भंगणार नाही; द्वीपे त्याच्या नियमशास्त्राची प्रतीक्षा करतात.


त्यांनी आपल्या शिष्यांना हेरोद्यांसह त्याच्याकडे पाठवून म्हटले, “गुरूजी आम्हांला ठाऊक आहे की, आपण खरे आहात, परमेश्वराचा मार्ग खरेपणाने शिकवता व कोणाची भीड धरत नाही; कारण आपण तोंड पाहून बोलत नाही.


मग पिलाताने मुख्य याजक, अधिकारी व लोक ह्यांना एकत्र बोलावून म्हटले,


परंतु परूशी व शास्त्री ह्यांनी आपणासंबंधाने असलेला देवाचा संकल्प व्यर्थ केला, कारण त्यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा घेतला नव्हता.


असे असूनही अधिकार्‍यांतून देखील पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपण सभाबहिष्कृत होऊ नये म्हणून परूश्यांमुळे ते तसे कबूल करत नव्हते;


येशूने त्याला उत्तर दिले, “मी जगासमोर उघडपणे बोललो आहे, सभास्थानांत व मंदिरात सर्व यहूदी जमतात तेथे मी नेहमी शिक्षण दिले, गुप्तपणे काही बोललो नाही.


परूश्यांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता; तो यहूद्यांचा एक अधिकारी होता.


“चला, मी केलेले सर्वकाही ज्याने मला सांगितले, तो मनुष्य पाहा; तोच ख्रिस्त असेल काय?”


ह्यावरून यरुशलेमकरांपैकी कित्येक जण म्हणू लागले, “ज्याला जिवे मारायला पाहतात तो हाच ना?


तेव्हा लोकसमुदायातील बर्‍याच जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते म्हणू लागले, “ख्रिस्त येईल तेव्हा तो ह्याने केलेल्या चिन्हांपेक्षा अधिक काय करणार आहे?”


अधिकार्‍यांपैकी किंवा परूश्यांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय?


त्याच्या आईबापांना यहूद्यांचे भय होते म्हणून ते असे म्हणाले, कारण हा ख्रिस्त आहे असे कोणी पत्करल्यास त्याला सभाबहिष्कृत करावे असे यहूद्यांचे अगोदरच एकमत झाले होते.


तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्‍चर्य करू लागले; आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले.


आणि त्यांची खातरी पटून प्रभूमधील बहुतेक बंधू माझ्या बंधनांमुळे उत्तेजित होऊन देवाचे वचन निर्भयपणे सांगण्यास अधिक धीट झाले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan