Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 7:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची मनीषा बाळगील त्याला ही शिकवण देवापासून आहे किंवा मी आपल्या मनचे बोलतो हे समजेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची इच्छा बाळगील त्यालाही शिकवण देवापासून आहे किंवा मी आपल्या मनाचे बोलतो हे समजेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करायची मनीषा बाळगील त्याला ही शिकवण देवाकडून आहे किंवा मी माझ्या स्वतःचे बोलतो, हे समजेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 जर कोणी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करण्याचा निर्धार करेल तर त्याला खात्रीने समजेल की माझी शिकवण परमेश्वरापासून आहे की मी स्वतःच्या मनाचे बोलत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 7:17
25 Iomraidhean Croise  

अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे; तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.


परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल.


परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणार्‍यांबरोबर असते; तो आपला करार त्यांना कळवील.


दुर्जनांना न्याय समजत नाही, पण परमेश्वराला शरण जाणार्‍यांना सर्वकाही समजते.


कारण परमेश्वराला कुटिलाचा वीट आहे. पण सरळांबरोबर त्याचे रहस्य आहे.


तेथील मार्ग राजमार्ग होईल; त्याला पवित्र मार्ग म्हणतील; त्याने अपवित्र जन जाणार नाहीत; पण तो त्यांच्यासाठीच, परमेश्वराच्या लोकांसाठी होईल; त्या मार्गाने जाणारे मूढ असले तरी मार्ग चुकणार नाहीत.


पुष्कळ लोक आपणांस शुद्ध व शुभ्र करतील; ते स्वच्छ होतील; पण दुर्जन दुर्वर्तन करतील; दुर्जनांपैकी कोणाला समज मिळणार नाही; पण जे सुज्ञ आहेत त्यांना तो प्राप्त होईल.


चला, आपण परमेश्वरास ओळखू; परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू; त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्‍चित आहे; तो पर्जन्याप्रमाणे भूमी शिंपणार्‍या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आमच्याकडे येईल.”


देशोदेशींच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी जातील व म्हणतील, “चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर, याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हांला आपले मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या वाटांनी चालू.” कारण सीयोनेतून शिक्षण व यरुशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल.


पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे त्या तुमच्यावर न्याय्यत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल; तुम्ही गोठ्यातल्या वत्सांप्रमाणे बाहेर पडून बागडाल.


डोळा शरीराचा दिवा आहे; ह्यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल;


चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की, ते वचन ऐकून सालस व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात.


परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो ह्यासाठी की, आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.”


तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? ह्याचे कारण हेच की, तुमच्याने माझे वचन ऐकवत नाही.


तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.


जो देवापासून आहे तो देवाची वचने ऐकतो; तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही.”


तेथील लोक थेस्सलनीकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला, आणि ह्या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करत गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan