Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 7:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 लोकसमुदायांतही त्याच्याविषयी बरीच कुजबुज सुरू झाली. कोणी म्हणत होते, “तो चांगला आहे;” कोणी म्हणत होते, “नाही, तो लोकांना फसवतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 आणि लोकांतही त्याच्याविषयी पुष्कळ कुजबुज सुरू झाली. कोणी म्हणत होते, “तो चांगला आहेः” दुसरे कोणी म्हणत होते, “नाही, तो लोकांस फसवतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 लोकसमुदायात त्याच्याविषयी बरीच कुजबुज सुरू झाली. कोणी म्हणत होते, “तो चांगला आहे”, इतर म्हणत होते, “नाही, तो लोकांना चुकीच्या मार्गाने नेत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 समुदायामध्ये त्यांच्याबद्दल सर्वत्र चर्चा होत होती. काही म्हणत होते, “तो खरोखर चांगला मनुष्य आहे.” तर इतर म्हणत होते, “नाही, तो लोकांची फसवणूक करतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 7:12
20 Iomraidhean Croise  

शिष्याने गुरूसारखे व दासाने धन्यासारखे व्हावे, इतके त्याला पुरे. घरधन्यास बालजबूल म्हटले तर घरच्या माणसांना कितीतरी अधिक म्हणतील?


ते त्याला धरण्यास पाहत होते, परंतु त्यांना लोकसमुदायाची भीती वाटली; कारण ते त्याला संदेष्टा मानत होते.


“महाराज, तो ठक जिवंत असता ‘तीन दिवसांनंतर मी उठेन’ असे म्हणाला होता, ह्याची आम्हांला आठवण आहे.


येशू त्याला म्हणाला, “मला उत्तम का म्हणतोस? एकावाचून म्हणजे देवावाचून कोणी उत्तम नाही.


तेव्हा जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचा गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.”


यहूद्यांच्या अरिमथाई नगरातला योसेफ नावाचा एक मनुष्य होता, तो न्यायसभेचा सदस्य असून सज्जन व नीतिमान होता.


चांगला मनुष्य आपल्या अंत:करणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाइटातून वाईट काढतो; कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.


तेव्हा सर्वांना भय वाटले व ते देवाला गौरवत म्हणाले, “आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे.”


तेव्हा येशूने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, “जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय.”


लोकसमुदाय त्याच्याविषयी अशी कुजबुज करत आहे हे परूश्यांच्या कानावर गेले; आणि मुख्य याजक व परूशी ह्यांनी त्याला धरण्यास कामदार पाठवले.


त्यावरून परूशी त्यांना म्हणाले, “तुम्हीही फसला आहात काय?


त्यांनी त्याला उत्तर दिले, “तुम्हीही गालीलातले आहात काय? शोध करून पाहा, की गालीलातून कोणी संदेष्टा उद्भवत नाही.”


ह्यावरून परूश्यांतील कित्येक म्हणाले, “हा मनुष्य देवापासून नाही, कारण तो शब्बाथ पाळत नाही.” दुसरे म्हणाले, “पापी मनुष्य अशी चिन्हे कशी करू शकतो?” अशी त्यांच्यामध्ये फूट पडली.


तो चांगला मनुष्य होता, आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता; तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले.


नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा; चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील;


जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा;


Lean sinn:

Sanasan


Sanasan