Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 5:44 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

44 जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करत नाही, त्या तुम्हांला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

44 जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव आहे त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करत नाही, त्या तुम्हास विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

44 जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याचा प्रयत्न करत नाही, त्या तुम्हांला श्रद्धा ठेवता येणे कसे शक्य आहे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

44 जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा स्वीकारता परंतु जो एकच परमेश्वर, त्यांच्याकडून प्रशंसा मिळविण्याचा प्रयत्न करत नाही, त्या तुम्हाला विश्वास तरी कसा ठेवता येईल?

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 5:44
26 Iomraidhean Croise  

पण परमेश्वराने माझा पिता दावीद ह्याला सांगितले की, ‘परमेश्वराच्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधावे असा तू मनोदय धरला आहेस हे तू चांगले केले आहेस;


कूशी माणसाला आपली कातडी, चित्त्याला आपले ठिपके पालटता येतील काय? असे घडेल तरच दुष्टतेला सवकलेल्या तुम्हांला चांगले आचरण करता येईल.


आपली सर्व कामे लोकांनी पाहावीत म्हणून ते ती करतात; ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करतात;


त्याने त्याला म्हटले, ‘शाबास, भल्या दासा; तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरांवर तुला अधिकार दिला आहे.’


कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मानवाकडील गौरव अधिक प्रिय वाटला.


सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.


कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही.


मी मनुष्यांकडून प्रशंसा करून घेत नाही.


तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? ह्याचे कारण हेच की, तुमच्याने माझे वचन ऐकवत नाही.


पण सत्कृत्य करणारा प्रत्येक, प्रथम यहूदी आणि मग हेल्लेणी, ह्यांना गौरव, सन्मान व शांती ही मिळतील.


परंतु जो अंतरी यहूदी तो यहूदी होय; आणि लेखाप्रमाणे व्हायची ती सुंता नव्हे तर आध्यात्मिकदृष्ट्या जी अंतःकरणाची व्हायची ती सुंता होय; अशाची प्रशंसा माणसाकडून नव्हे, तर देवाकडून होते.


म्हणजे जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच;


म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका; तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील; आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील.


कारण स्वत:ची वाखाणणी करणारा पसंतीस उतरत नाही, तर ज्याची वाखाणणी प्रभू करतो तोच पसंतीस1 उतरतो.


तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना.


आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आमचे वजन पडण्यासारखे होते तरी माणसांपासून म्हणजे तुमच्यापासून किंवा दुसर्‍यांपासून गौरव मिळवण्याची खटपट आम्ही करत नव्हतो.


जो सनातन, अविनाशी, अदृश्य राजा, असा एकच ज्ञानी देव, त्याला सन्मान व गौरव युगानुयुग असो. आमेन.


बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यातील कोणाचेही असू नये म्हणून जपा.


माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही तोंड पाहून वागू नका.


ह्यासाठी की, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात त्या सोन्यापेक्षा मूल्यवान अशी जी तुमच्या विश्वासाची परीक्षा ती येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांस कारणीभूत व्हावी.


अशा आपल्या उद्धारक एकाच ज्ञानी देवाला, (येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या द्वारे) गौरव, महिमा, पराक्रम व अधिकार युगारंभापूर्वी, आता व युगानुयुग आहेत. आमेन.


मग तो म्हणाला, “मी तर पाप केलेच आहे, तरीपण आता माझ्या प्रजेच्या वडील जनांसमोर व इस्राएलासमोर माझा मान राखा व माझ्याबरोबर परत या म्हणजे आपला देव परमेश्वर ह्याची मी उपासना करीन.”


ह्यास्तव इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालू राहील असे मी म्हटले होते खरे, पण आता परमेश्वर म्हणतो, असे माझ्या हातून न घडो; कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan