Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 5:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्यांमध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे ह्यांचा मोठा समुदाय पडलेला असे. [ते पाणी हलण्याची वाट पाहत असत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 [त्यांमध्ये रोगी, आंधळे, पांगळे आणि लुळे ह्यांचा मोठा समुदाय असे. ते पाणी ढवळण्याची वाट पाहत असत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 येथे लंगडे, आंधळे, लुळे असे अनेक अपंग लोक पडून असत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 5:3
12 Iomraidhean Croise  

देवाच्या माणसाने बेथेलातल्या त्या वेदीविरुद्ध जे हे शब्द उच्चारले ते राजा यराबाम ह्याने ऐकले तेव्हा तो आपला हात वेदीवरून काढून पुढे करून म्हणाला, “त्याला धरा.” तेव्हा त्याने जो हात त्याच्याकडे केला होता तो वाळून गेला व तो त्याला मागे घेता येईना.


जो माझ्या दारांशी नित्य जागत राहून, माझ्या दारांच्या खांबांजवळ उभा राहून, माझे ऐकतो तो धन्य.


परमेश्वरापासून येणार्‍या तारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे.


कळपास सोडून देणार्‍या कवडीमोल मेंढपाळास धिक्कार असो! त्याच्या बाहूवर व त्याचा उजव्या डोळ्यावर तलवार चालेल; त्याचा बाहू सुकेल, त्याचा उजवा डोळा अगदी अंध होईल.”


मग लोकांचे थव्यांचे थवे त्याच्याकडे आले; त्यांच्याबरोबर लंगडे, व्यंग असलेले, आंधळे, मुके व दुसरे पुष्कळ जण होते; त्यांना त्यांनी त्याच्या पायांशी आणून ठेवले आणि त्याने त्यांना बरे केले.


आणि त्याची कीर्ती सूरिया देशभर पसरली; तेव्हा जे नाना प्रकारचे रोग आणि व्यथा ह्यांनी पिडलेले होते, जे भूतग्रस्त, फेफरेकरी व पक्षाघाती होते, अशा सर्व दुखणाइतांना त्याच्याकडे आणले, आणि त्याने त्यांना बरे केले.


मग त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या व ऐकल्या त्या योहानाला जाऊन सांगा, ‘आंधळे डोळस होतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.’


यरुशलेमेत मेंढरेदरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेथेस्दा म्हणतात; त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत.


कारण की, देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे.]


पण जे अदृश्य त्याची जर आपण आशा धरली तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करत असतो.


अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पाहा, शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता, त्याला ‘पहिला व शेवटला पाऊस’ मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan