Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 5:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस; आतापासून पाप करू नकोस; करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 त्यानंतर तो येशूला परमेश्वराच्या भवनात भेटला तेव्हा तो त्यास म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नकोस, करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला, तेव्हा येशू त्याला म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस. आतापासून तू पाप करू नकोस, नाही तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 नंतर येशूंना तो मनुष्य मंदिरात आढळला आणि येशूंनी त्याला सांगितले, “पाहा, तू आता बरा झाला आहेस. येथून पुढे पाप करू नकोस, नाही तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 5:14
23 Iomraidhean Croise  

संकटसमयी ह्या आहाज राजाने परमेश्वराचा अधिकच अपराध केला.


पण जेव्हा जेव्हा त्यांना स्वास्थ्य मिळे तेव्हा तेव्हा ते तुझ्यासमोर दुष्कर्म करीत; ह्यामुळे तू त्यांना शत्रूंच्या हाती दिलेस व त्यांनी त्यांच्यावर सत्ता केली; तरी त्यांनी तुझ्याकडे वळून तुझा धावा केला, तो तू स्वर्गातून ऐकला आणि तुझ्या दयेच्या कृत्यांना अनुसरून तू त्यांना अनेक वेळा मुक्त केलेस.


परमेशाने मला जबर शासन केले; तरी मला मृत्यूच्या हवाली केले नाही.


त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत, मी त्याच्या विधींचा त्याग केला नाही.


आता सभोवतालच्या माझ्या वैर्‍यांपुढे माझे मस्तक उन्नत होईल; त्याच्या डेर्‍यात मी उत्सवपूर्वक यज्ञ करीन. मी गायनवादन करीन, परमेश्वराचे गुणगान गाईन.


हे परमेश्वरा, माझ्यावर दया कर, मला मृत्युद्वारातून उठवणार्‍या, माझा द्वेष करणार्‍यांपासून मला झालेली पीडा पाहा;


परमेश्वर मला तारण्यास सिद्ध आहे; म्हणून आम्ही आपली तंतुवाद्ये वाजवू; ती सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात वाजवू.”


हिज्कीयाने म्हटले होते, “मी परमेश्वराच्या मंदिरात चढून जाईन ह्याचे चिन्ह काय?”


याजकाने तपासणी करावी आणि जर कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली दिसली व त्यावरील केस पांढरे झालेले असले, तर त्याने त्याला अशुद्ध ठरवावे; फोडातून बाहेर पडलेला हा महारोगाचा चट्टा होय.


एवढे सर्व करूनही माझे तुम्ही ऐकले नाही व माझ्याविरुद्ध वागलात,


त्याला ते उपकारस्तुतीसाठी करायचे असेल तर तेलात मळलेल्या बेखमीर पोळ्या, तेल लावलेल्या बेखमीर चपात्या आणि तेलात मळलेल्या सपिठाच्या तळलेल्या पोळ्या उपकारस्तुतीच्या यज्ञासहित अर्पाव्यात.


नंतर तो जाऊन आपणापेक्षा दुष्ट असे दुसरे सात आत्मे आपणाबरोबर घेऊन येतो आणि ते आत जाऊन तेथे राहतात; मग त्या माणसाची शेवटली दशा पहिलीपेक्षा वाईट होते; तसेच ह्या दुष्ट पिढीचेही होईल.


त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षाघाती माणसाला म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”


तो कोण आहे हे त्या बर्‍या झालेल्या माणसाला ठाऊक नव्हते; कारण त्या ठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू निसटून गेला होता.


तेथे अडतीस वर्षे आजारी असलेला कोणीएक माणूस होता.


ती म्हणाली, “प्रभूजी, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मीही तुला दंड ठरवत नाही; जा; ह्यापुढे पाप करू नकोस.]


कारण परराष्ट्रीयांना आवडणारी कृत्ये करण्यात म्हणजे कामासक्ती, विषयवासना, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व निषिद्ध मूर्तिपूजा ह्यांत चालण्यात जो काळ गेला तितका पुरे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan