Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 4:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तुम्हांला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता; आम्हांला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो; कारण यहूद्यांतूनच तारण आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तुम्ही ज्याला ओळखीत नाही अशाची उपासना करता; आम्हास ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो, कारण यहूद्यांतूनच तारण आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 तुम्हांला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता परंतु आम्हांला ठाऊक आहे, अशाची उपासना आम्ही करतो; कारण तारण यहुदी लोकांमधूनच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 तुम्ही शोमरोनी तुम्हाला माहीत नाही, अशाची उपासना करता; पण जो आम्हाला माहीत आहे आम्ही त्याची उपासना करतो. कारण उद्धार यहूदी लोकांपासून आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 4:22
20 Iomraidhean Croise  

यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत1 ते त्याच्याकडून जाणार नाही, राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही; राष्ट्रे त्यांची आज्ञांकित होतील.


तेव्हा ते जरूब्बाबेल व पितृकुळांचे प्रमुख पुरुष ह्यांच्याकडे येऊन म्हणू लागले, “आम्हीही तुमच्याप्रमाणे तुमच्या देवाच्या भजनी लागलो आहोत; अश्शूरचा राजा एसर-हद्दोन ह्याने आम्हांला इकडे आणून ठेवले त्या दिवसापासून त्याच देवाला आम्ही यज्ञ करीत आलो आहोत; ह्यास्तव तुमच्याबरोबर आम्हांलाही मंदिर बांधूं द्या;”


तो याकोबाला आपले वचन, इस्राएलाला आपले नियम व निर्णय विदित करतो.


देव आम्हांला संकटांतून मुक्त करणारा देव आहे; आणि मृत्यूपासून सोडवणारा प्रभू परमेश्वर आहे.


पाहा, देव माझे तारण आहे; मी भाव धरतो, भीत नाही; कारण प्रभू परमेश्वर1 माझे बल व गीत आहे; तो मला तारण झाला आहे.”


अगे सीयोननिवासिनी, जयघोष कर, गजर कर; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझ्या ठायी थोर आहे.”


देशादेशांतील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, “चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हांला आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.” कारण सीयोनेतून नियमशास्त्र व यरुशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल.


मी आपला न्याय जवळ आणत आहे, आता तो दूर नाही; माझ्याकडून होणार्‍या उद्धारास विलंब लागणार नाही; मी सीयोनेत उद्धार स्थापतो, इस्राएलास माझे गौरव देतो.”


सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे.


आणि यरुशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्‍चात्ताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी.


कारण मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना, ‘अज्ञात देवाला’ ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली. ज्यांचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हांला जाहीर करतो.


अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्‍चात्ताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो.


देवाने आपल्या ‘सेवकाला’ उठवून प्रथम तुमच्याकडे पाठवले, ह्यासाठी की, त्याने तुम्हा प्रत्येकाला तुमच्या दुष्कृत्यांपासून वळून जाण्याचा आशीर्वाद देत जावा.”


तर त्या फांद्यांहून मी मोठा आहे अशी बढाई मारू नकोस. मारशील तर हे लक्षात ठेव की, तू मुळाला आधार दिलेला नाहीस, तर मुळाने तुला आधार दिलेला आहे.


कारण आपला प्रभू हा यहूदा वंशातून उद्भवला हे उघड आहे. याजकांच्या बाबतीत त्या वंशाविषयी मोशेने काही सांगितलेले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan