Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 3:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 योहानाने उत्तर दिले, “मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 योहानाने उत्तर दिले, “मनुष्यास स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 योहानने उत्तर दिले, “मनुष्याला स्वर्गातून दिेल्यावाचून काहीच मिळू शकत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 त्यावर योहानाने उत्तर दिले, “मनुष्याला जे काही स्वर्गातून दिले जाईल तेच प्राप्त होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 3:27
27 Iomraidhean Croise  

“मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास, तू उदरातून निघण्यापूर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे.”


मी तुला अनुसरणारा तुझा मेंढपाळ होण्यापासून माघार घेतली नाही आणि मी संकटाच्या दिवसाची अपेक्षाही केली नाही हे तुला ठाऊक आहे; जे माझ्या तोंडून निघाले ते तुझ्या दृष्टीसमोर होते.


मी कळपांमागे असता परमेश्वराने मला निवडले; परमेश्वर मला म्हणाला, ‘जा, माझे लोक इस्राएल ह्यांना संदेश सांग.’


ज्या पुरुषाला मी निवडीन त्याच्या काठीला अंकुर फुटतील; इस्राएल लोक तुमच्याविरुद्ध कुरकुर करीत आहेत ते त्यांचे कुरकुरणे मी अशा रीतीने बंद करीन.”


योहानाचा बाप्तिस्मा कोठून होता? स्वर्गापासून किंवा माणसांपासून?” तेव्हा ते आपसांत विचार करू लागले की, “‘स्वर्गापासून’ म्हणावे तर हा आपल्याला म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’


एकाला त्याने पाच हजार रुपये, एकाला दोन हजार व एकाला एक हजार असे ज्याच्या-त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले; आणि तो परदेशी गेला.


प्रवासाला जात असलेल्या कोणाएका माणसाने आपले घर सोडतेवेळी आपल्या नोकरांना अधिकार देऊन ज्याचे त्याला काम नेमून द्यावे व द्वारपाळास जागृत राहण्याची आज्ञा करावी तसे हे आहे.


तेव्हा त्याच्याकडे पुष्कळ लोक आले; ते म्हणाले, “योहानाने काही चिन्ह केले नाही खरे; तरी योहानाने ह्याच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे.”


मग तो म्हणाला, “ह्याच कारणास्तव मी तुम्हांला सांगितले की, पित्याने कोणाही मनुष्याला तशी देणगी दिल्यावाचून तो माझ्याकडे येऊ शकत नाही.” येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली


त्याच्या द्वारे आम्हांला कृपा व प्रेषितपद मिळाले; अशासाठी की, त्याच्या नावाकरता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे.


आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत, म्हणून ईश्वरी संदेश सांगायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा;


करिंथ येथील देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलावलेल्या लोकांना, आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू, ह्याचे नाव सर्व ठिकाणी घेणार्‍या सर्वांना,


तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो.


तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही; परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले, ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणार्‍या देवाच्या कृपेने केले.


अपुल्लोस कोण? आणि पौल कोण? ज्यांच्या द्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत; ज्याला-त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत.


तुला निराळेपण कोणी दिले? आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता, दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस?


गलतीयातील मंडळ्यांना : मनुष्यांकडून नव्हे, किंवा कोणा माणसाच्या द्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यांतून उठवले तो देवपिता, ह्यांच्या द्वारे प्रेषित झालेला पौल, त्या माझ्याकडून व माझ्या-बरोबरच्या सर्व बंधूंकडून :


इफिस येथील पवित्र जन व ख्रिस्त येशूच्या ठायी विश्वास ठेवणारे ह्यांना देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून :


ह्या साक्षीसाठी मला घोषणा करणारा व प्रेषित (मी ख्रिस्ताठायी सत्य बोलतो, खोटे बोलत नाही), विश्वास व सत्य ह्यांसंबंधी परराष्ट्रीयांचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले.


प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे; ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan