Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 20:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरीया मग्दालीया कबरेजवळ आली, आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आठवड्याच्या पहिल्या दिवशी, पहाटेस अंधारातच, मग्दालीया नगराची मरीया कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढली आहे असे तिने पाहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच रविवारी पहाटेस अंधारातच मरिया मग्दालिया कबरीजवळ गेली आणि कबरीवरून शिळा बाजूला सारलेली आहे, असे तिने पाहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 आठवड्याच्या पहिल्या दिवशी अगदी पहाटेस, अंधार असताना, मरीया मग्दालिया कबरेकडे गेली आणि प्रवेशद्वारावरून मोठी धोंड बाजूला लोटलेली आहे, असे तिने पाहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 20:1
19 Iomraidhean Croise  

त्यांच्यामध्ये मग्दालीया मरीया, याकोब व योसे ह्यांची आई मरीया, व जब्दीच्या मुलांची आई ह्या होत्या.


ते त्याने खडकात खोदलेल्या आपल्या नव्या कबरेत ठेवले, एक मोठी धोंड लोटून ती कबरेच्या दाराला लावली आणि तो निघून गेला.


म्हणून तिसर्‍या दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करण्यास सांगावे, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य [रात्री] येऊन त्याला चोरून नेतील व ‘तो मेलेल्यांतून उठला आहे’ असे लोकांना सांगतील; मग शेवटली फसगत पहिल्यापेक्षा वाईट होईल.”


मग पहारा बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी धोंडेवर शिक्‍कामोर्तब करून कबरेचा बंदोबस्त केला.


शब्बाथानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच मग्दालीया मरीया व दुसरी मरीया ह्या कबर पाहण्यास आल्या.


तेव्हा पाहा, मोठा भूमिकंप झाला; कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला, त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली आणि तिच्यावर तो बसला.


त्याने तागाचे वस्त्र विकत आणले व त्याला खाली काढून ते तागाचे वस्त्र त्याच्याभोवती गुंडाळले; मग त्याला खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले व कबरेच्या तोंडाशी धोंड लोटून बसवली.


[आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रात:काळी त्याचे पुनरुत्थान झाल्यावर त्याने पहिल्याप्रथम मग्दालीया मरीया हिला दर्शन दिले; हिच्याचमधून त्याने सात भुते काढली होती.


येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती.


ह्यावरून [मृताला ठेवले होते तेथून] त्यांनी धोंड काढली; तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, “हे बापा, तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे आभार मानतो.


येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरीया आणि मरीया मग्दालीया ह्या उभ्या होत्या.


मग आठ दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, “तुम्हांला शांती असो.”


मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो तेव्हा पौलाने त्यांच्याबरोबर भाषण केले; तो दुसर्‍या दिवशी जाणार होता आणि त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबवले.


आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले असेल3 त्या मानाने आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवावे; अशा हेतूने की, मी येईन तेव्हा वर्गण्या होऊ नयेत.


प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्यामागे कर्ण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan