Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 2:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 “प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग नीरस वाढतो; तू तर चांगला द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहेस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्यास म्हटले, “प्रत्येक मनुष्य अगोदर चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग बेचव वाढतो, पण तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहेस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 “प्रत्येक मनुष्य प्रथम उत्तम दर्जाचा द्राक्षारस वाढतो आणि लोक द्राक्षारस यथेच्छ प्याले म्हणजे नंतर साधारण दर्जाचा वाढतो. तू तर उत्तम द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहेस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “प्रत्येकजण उत्तम द्राक्षारस प्रथम वाढतो आणि पाहुणे पिऊन तृप्त झाले की, मग हलक्या प्रतीचा वाढतो; तुम्ही तर उत्तम द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 2:10
15 Iomraidhean Croise  

मग योसेफापुढची पक्वान्ने त्यांना नेऊन वाढली, पण बन्यामिनाला इतरांच्या पाचपट वाढले, आणि ते त्याच्याबरोबर मनमुराद प्याले.


म्हणजे मनुष्याचे अंतःकरण आनंदित करणारा द्राक्षारस; त्याचे मुख टवटवीत करणारे तेल, मनुष्याच्या जिवाला आधार देणारी भाकर, ही त्याने उत्पन्न करावी.


हे माझे भगिनी, माझे वधू, मी आपल्या बागेत आलो आहे; मी आपला गंधरस व सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत; मी आपले मधूने थबथबलेले पोळे खाल्ले आहे; मी दुग्ध व द्राक्षारस ही सेवन केली आहेत; मित्रहो, खा; प्रियजनहो, प्या, मनमुराद प्या.


आणि आपल्या सोबतीच्या दासांना मारू लागेल व झिंगलेल्यांबरोबर खाईलपिईल,


परंतु ‘आपला धनी येण्यास उशीर लागेल’ असे आपल्या मनात म्हणून तो दास चाकरांस व चाकरिणींस मारहाण करू लागेल, आणि खाऊनपिऊन मस्त होईल,


अब्राहाम म्हणाला, ‘मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, ह्याची आठवण कर; आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस.


तुम्हांला वाटते तसे हे मस्त झाले नाहीत; कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे;


कारण भोजन करतेवेळी प्रत्येक जण आपल्या घरचे जेवण दुसर्‍यापूर्वी जेवतो; एक भुकेला राहतो तर एक मस्त होतो.


द्राक्षारसाने मस्त होऊ नका; द्राक्षारसात बेतालपणा आहे; पण आत्म्याने परिपूर्ण व्हा;


झोप घेणारे रात्री झोप घेतात, आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात.


‘तिच्याबरोबर पृथ्वीवरील राजांनी जारकर्म केले’ आणि ‘तिच्या’ जारकर्मरूपी ‘द्राक्षारसाने पृथ्वीवर’ राहणारे ‘मस्त झाले.”’


ती स्त्री पवित्र जनांच्या रक्ताने व येशूच्या रक्तसाक्ष्यांच्या रक्ताने मस्त झालेली माझ्या दृष्टीस पडली. तिला पाहून मला फार आश्‍चर्य वाटले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan