Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 17:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 ह्यापुढे मी जगात नाही, पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, ह्यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 आणि आता, यापुढे मी जगात नाही; पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 ह्यापुढे मी जगात नाही परंतु ते मात्र ह्या जगात आहेत. आता मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे म्हणून, तू मला दिलेल्या तुझ्या नावाने त्यांचे संरक्षण कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 आता मी या जगात राहणार नाही, मी तुमच्याकडे येत आहे, परंतु ते या जगात अजूनही आहेत. पवित्र पित्या, जे नाव तुम्ही मला दिले आहे, त्या नावाच्या सामर्थ्याने त्यांना सुरक्षित ठेवा, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 17:11
48 Iomraidhean Croise  

हे आमच्या उद्धारक देवा, तू आपल्या नावाच्या महिम्यासाठी आम्हांला साहाय्य कर; आपल्या नावासाठी आम्हांला सोडव व आमची पातके धुऊन टाक.


परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग आहे, त्यात नीतिमान धावत जाऊन निर्भय राहतो.


त्याची निगा ठेवणारा मी परमेश्वर; मी त्याला घडोघडी पाणी घालतो; त्याला कोणी उपद्रव करू नये म्हणून मी त्याची रात्रंदिवस राखण करतो.


अग्नी जसा काड्याकुड्या जाळतो व पाणी उकळवतो तसा तू आपल्या शत्रूंना आपले नाम प्रकट करण्यासाठी उतरला असतास;


तू आपल्या नामास्तव आमचा वीट मानू नकोस; तुझ्या वैभवाच्या गादीची अप्रतिष्ठा करू नकोस; आमच्याशी केलेला करार स्मर, तो मोडू नकोस.


हे परमेश्वरा, आमचे अपराध जरी आमच्याविरुद्ध साक्ष देतात तरी तू आपल्या नामास्तव कार्य कर; आमचे कितीदा पतन झाले आहे! तुझ्याविरुद्ध आम्ही पाप केले आहे.


तथापि ज्या राष्ट्रांसमक्ष मी त्यांना बाहेर आणले त्यांच्यादेखत माझ्या नामाचा अपमान न व्हावा म्हणून मी आपला हात आवरला; माझ्या नामासाठी अशी कृती मी केली.


हे इस्राएल घराण्या, प्रभू परमेश्वर म्हणतो, तुमच्या कुमार्गाप्रमाणे, तुमच्या भ्रष्ट कृत्यांप्रमाणे नव्हे, तर माझ्या नामासाठी मी तुमच्यात कृती करीन, तेव्हा तुम्हांला समजेल की, मी परमेश्वर आहे.”


तथापि माझ्या नामासाठी, ज्या राष्ट्रांमध्ये ते राहत होते त्यांच्यादेखत माझ्या नामाचा अपमान न व्हावा, म्हणून मी हे कार्य केले; मी त्यांना मिसर देशातून काढून त्या राष्ट्रांच्यादेखत त्यांना प्रकट झालो.


पाहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो; म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.


ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे ‘तुम्ही पूर्ण व्हा.’


ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा : ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.


वल्हांडण सणापूर्वी असे झाले की, येशूने आता ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून ह्या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले.


तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे, व आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होतेवेळी


त्या दिवशी तुम्हांला समजेल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे, व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुमच्यामध्ये आहे.


मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा जग सोडून मी पित्याकडे जात आहे.”


माझ्या ठायी तुम्हांला शांती मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे.”


म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये; ह्यासाठी की, त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवलेस आणि जशी तू माझ्यावर प्रीती केलीस तशी त्यांच्यावरही प्रीती केलीस.


हे न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, पण मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवलेस असे त्यांनी ओळखले आहे.


जे लोक तू मला जगातून दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रकट केले; ते तुझे होते आणि तू ते मला दिलेस; आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे.


ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे, मग ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी निघून जाणार आहे.


सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाने सांगितले त्या काळापर्यंत येशूला स्वर्गात राहणे प्राप्त आहे.


तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत.


शास्त्रलेख फारोला असे सांगतो, “मी तुला पुढे केले आहे ते ह्याचकरता की, तुझ्याकडून मी आपला पराक्रम दाखवावा आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे.”


बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत; तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे.


यहूदी व हेल्लेणी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री, हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्व जण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहात;


तुम्हांला झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच व आत्मा एकच आहे.


ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले;


हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे, आणि [स्वतः आमच्या] पापांची शुद्धी केल्यावर तो उर्ध्वलोकी राजवैभवाच्या ‘उजवीकडे बसला.’


खर्‍या गोष्टींचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्रस्थान ह्यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला.


अहो अविश्वासू लोकांनो,1 जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे.


काइन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनाची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती.


आपण देवापासून आहोत हे आपल्याला ठाऊक आहे; सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.


देवपित्याने पवित्र केलेले आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक ह्यांना येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहूदा ह्याच्याकडून :


तुम्हांला पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात निर्दोष असे उल्लासाने उभे करण्यास जो समर्थ आहे,


‘हे प्रभो, तुला कोण भिणार नाही? तुझ्या नावाला कोण महिमा देणार नाही?’ कारण तूच मात्र ‘पवित्र’ आहेस; आणि तुझी न्यायकृत्ये प्रकट झाली आहेत, म्हणून ‘सर्व राष्ट्रे तुझ्यासमोर येऊन तुला नमन करतील.”’


‘त्याचे डोळे अग्नीच्या’ ज्वालेसारखे व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते; त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे; ते त्याच्यावाचून कुणालाही कळत नाही.


त्या चारही प्राण्यांना ‘प्रत्येकी सहा-सहा पंख असून ते प्राणी’ आतून ‘बाहेरून सर्वांगी, डोळ्यांनी भरलेले’ होते; आणि, “पवित्र, पवित्र, पवित्र, जो होता, ‘जो आहे’ व जो येणार तो ‘सर्वसमर्थ प्रभू देव,”’ असे ते रात्रंदिवस म्हणतात, ते कधीच थांबत नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan