Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 16:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 ह्याप्रमाणे तुम्हांला आता दुःख झाले आहे; तरी मी तुम्हांला पुन्हा भेटेन, आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 आणि म्हणून, आता तुम्हास दुःख झाले आहे; तरी मी तुम्हास पुन्हा भेटेन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल आणि तुमच्यापासून तुमचा आनंद कोणीही हिरावून घेणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 ह्याप्रमाणे तुम्हांला आता दुःख झाले तरी मी तुम्हांला पुन्हा पाहीन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमच्याकडून तुमचा आनंद कोणीही हिरावून घेणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 त्याच प्रकारे आता दुःख करण्याची तुमची वेळ आहे, परंतु मी तुम्हाला पुन्हा भेटेन तेव्हा तुमचे हृदय आनंदी होईल आणि तुमचा आनंद तुमच्यापासून कोणीही हिरावून घेणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 16:22
40 Iomraidhean Croise  

त्याने कोणाला शांतिसमाधान दिले तर त्याला कोण दोष देईल? त्याने तोंड फिरवले तर त्याचे दर्शन कोणाला होईल? हे राष्ट्रासंबंधाने असो की एका व्यक्तीसंबंधाने असो, सारखेच;


माझ्या जिवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन; मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्र गाईन.


त्याच्या ठायी आमच्या हृदयाला आनंद आहे, कारण त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे.


त्या दिवशी ते म्हणतील, “पाहा, हा आमचा देव! ह्याची आम्ही आशा धरून राहिलो; तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे. ह्याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पावू.”


ते येऊन सीयोनेच्या माथ्यावर आनंदाने गातील; परमेश्वराची उपयुक्त वरदाने म्हणजे धान्य, नवा द्राक्षारस, ताजे तेल व गुरामेंढरांचे वत्स ह्यांकडे लोटतील; त्यांचा जीव भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होईल; ह्यापुढे ते म्लान होणार नाहीत.


तेव्हा त्या स्त्रिया भीतीने व हर्षातिशयाने कबरेपासून लवकर निघून त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगण्यास धावत गेल्या.


परंतु थोडक्याच गोष्टींचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे; मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”


अब्राहाम म्हणाला, ‘मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, ह्याची आठवण कर; आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगत आहेस.


मी तुम्हांला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल, आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे तेदेखील त्याच्यापासून घेतले जाईल.


मग आनंदामुळे त्यांना ते खरे न वाटून ते आश्‍चर्य करत असता त्याने त्यांना म्हटले, “येथे तुमच्याजवळ खाण्यास काही आहे काय?”


“तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.


आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही; पण तुम्ही पाहाल; मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल.


मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो; मी आपली शांती तुम्हांला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये.


थोड्या वेळाने मी तुम्हांला दिसणार नाही; आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. [कारण मी पित्याकडे जातो.]”


मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील; तुम्हांला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल.


ह्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्यामुळे तुमचे अंतःकरण खेदाने भरले आहे.


ह्यावरून ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “हा प्रभूच आहे.” “प्रभू आहे” हे ऐकून शिमोन पेत्राने अंगरखा घालून तो कंबरेला गुंडाळून घेतला, (कारण तो उघडा होता) आणि त्याने समुद्रात उडी टाकली.


परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही; जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.”


इकडे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.


मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते.


ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालस मनाने जेवत असत.


ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरवण्यात आलो म्हणून आनंद करत न्यायसभेपुढून निघून गेले.


दु:खी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे; दरिद्री मानलेले तरी पुष्कळांना सधन करणारे; कफल्लक असे मानलेले तरी सर्ववस्तुसंपन्न, अशी आम्ही आपली लायकी पटवून देतो.


आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता,


कारण बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झालात आणि [स्वर्गात]आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे, हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली.


ह्यासाठी की, जे आपण, स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरता आश्रयाला धावलो, त्या आपणांला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन अचल गोष्टींच्या द्वारे चांगले उत्तेजन मिळावे.


त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता; आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता; आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जिवांचे तारण, ते उपभोगत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्लासता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan