Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 16:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते; परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशांची आठवण होत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते; पण बालक जन्मल्यावर जगात एक मनुष्य जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 स्त्री प्रसूत होत असताना तिला वेदना होतात कारण तिची प्रसूतीची घटका जवळ आलेली असते. परंतु बालक जन्मल्यावर, जगात एक मानव जन्मला आहे म्हणून तिला जो आनंद होतो, त्यामुळे तिला त्या वेदनांची आठवण होत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 जी स्त्री बाळाला जन्म देते तिला वेदना होतात कारण तिची वेळ आलेली असते; परंतु जेव्हा तिचे बाळ जन्मास येते तेव्हा ती तिच्या बाळाला या जगात जन्मलेले पाहून आनंद करते व सर्व यातना विसरून जाते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 16:21
18 Iomraidhean Croise  

तो स्त्रीला म्हणाला, “मी तुझे दु:ख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन; तू क्लेशाने लेकरे प्रसवशील; तरी तुझा ओढा नवर्‍याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील.”


कारण तू आपले दुःख विसरशील; ओसरलेल्या पाण्यासारखे ते तुला आठवेल;


तो वांझ स्त्रीला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करतो. परमेशाचे स्तवन करा!1


ते अगदी घाबरले आहेत. त्यांना पेटके व वेदना घेरत आहेत; प्रसूत होणार्‍या स्त्रीप्रमाणे ते वेणा देत आहेत. एकमेकांकडे टकमक पाहत आहेत; त्यांची मुखे काळवंडली आहेत.


हे पाहून माझ्या कंबरेस कळा लागल्या आहेत; प्रसूत होणार्‍या स्त्रीच्या वेदनांप्रमाणे मला वेदना होत आहेत; मी एवढे आळेपिळे देत आहे की मला ऐकू येत नाही; मी इतका घाबरलो आहे की मला दिसत नाही.


वेणा येण्यापूर्वीच ती प्रसूत झाली, वेदना होण्यापूर्वीच तिला पुत्र झाला.


हे सीयोनकन्ये, तुला कापरे भरू दे; प्रसूत होणार्‍या स्त्रीप्रमाणे तुला वेदना होऊ दे; कारण तू आता शहराबाहेर जाशील, शेतात वस्ती करशील व बाबेलपर्यंतही जाशील, तेथे तुझी सुटका होईल. तेथे परमेश्वर तुला तुझ्या वैर्‍यांच्या हातून सोडवील.


तर तू आता अशी मोठ्याने का आक्रोश करतेस? तुझ्यामध्ये कोणी राजा नाही काय? तुझा मंत्री मेला काय? कारण प्रसवत्या स्त्रीसारख्या तुला कळा लागल्या आहेत.


शास्त्रात असे लिहिले आहे, “अगे वंध्ये, तुला मूल होत नसले तरी आनंदित हो! ज्या तुला प्रसूतिवेदना होत नाही ती तू आनंदाने जयघोष कर! आनंदाची आरोळी मार! कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा अशा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत.”


“शांती आहे, सुरक्षितता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो, आणि ते निभावणारच नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan