Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 16:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 ते तुम्हांला सभाबहिष्कृत करतील, इतकेच काय पण तुमचा जीव घेणार्‍या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करत आहोत असे वाटेल, अशी वेळ येत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 ते तुम्हास सभास्थानाच्या बाहेर घालवतील; इतकेच काय पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहोत असे वाटेल, अशी वेळ येत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 तुम्हांला सभास्थानातून बहिष्कृत करण्यात येईल. इतकेच काय पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला तो देवाची सेवा करत आहे, असे वाटेल, अशी वेळ येत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 कारण ते तुम्हाला सभागृहामधून काढून टाकतील आणि खरोखर, अशी वेळ येत आहे की, जे कोणी तुम्हाला जिवे मारतील त्यांना आपण परमेश्वराला सेवेचा यज्ञ अर्पण करीत आहोत असे वाटेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 16:2
27 Iomraidhean Croise  

ते म्हणतात, ‘हां! जवळ येऊ नकोस; तुझ्यापेक्षा मी पवित्र आहे.’ ते माझ्या नाकात धुरासारखे, सतत पेटलेल्या अग्नीसारखे आहेत.


परमेश्वराचे वचन ऐकून कंपायमान होणार्‍यांनो, त्याचे वचन ऐका : “तुमचा द्वेष करणारे तुमचे जे बंधू माझ्या नामाचे निमित्त करून तुम्हांला हाकून देतात व म्हणतात की, ‘परमेश्वराचा गौरव होवो म्हणजे तुमचा हर्ष आम्हांला पाहण्यास मिळेल,’ ते फजीत होतील.


लोकांतले जे सुज्ञ पुरुष ते पुष्कळांना बोध करतील; परंतु ते बरेच दिवस तलवार, अग्नी, बंदिवास व लुटालूट ह्यांनी संकटात पडतील.


जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करण्यास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या.


तेव्हा तुमचे हाल करण्याकरता ते तुम्हांला धरून देतील व तुम्हांला जिवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील.


मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हांला वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य.


असे असूनही अधिकार्‍यांतून देखील पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपण सभाबहिष्कृत होऊ नये म्हणून परूश्यांमुळे ते तसे कबूल करत नव्हते;


ह्या गोष्टी मी तुम्हांला अन्योक्तीने सांगितल्या आहेत; मी तुमच्याबरोबर अन्योक्तीने आणखी बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हांला उघड सांगेन अशी घटका येत आहे.


पाहा, अशी वेळ येत आहे, किंबहुना आली आहे, की तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल व मला एकटे सोडाल; तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे.


येशू तिला म्हणाला, “बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेमेतही करणार नाही अशी वेळ येत आहे, हे माझे खरे मान.


तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे; किंबहुना आलीच आहे; कारण असे आपले उपासक असावेत अशीच पित्याची इच्छा आहे.


त्याच्या आईबापांना यहूद्यांचे भय होते म्हणून ते असे म्हणाले, कारण हा ख्रिस्त आहे असे कोणी पत्करल्यास त्याला सभाबहिष्कृत करावे असे यहूद्यांचे अगोदरच एकमत झाले होते.


त्यांनी त्याला म्हटले, “तू सर्वस्वी पापात जन्मलास आणि आम्हांला शिकवतोस काय?” मग त्यांनी त्याला बाहेर घालवले.


हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जिवे मारण्याचा विचार करू लागले.


आणि त्याने म्हटले, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.”


आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करतो; आम्ही जगाचा गाळ, सर्वांची खरवड असे आजपर्यंत झालो आहोत.


आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; नियमशास्त्रातील नीतिमत्त्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे.


त्याने पाचवा शिक्का फोडला तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले; ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जिवे मारलेल्या लोकांचे होते.


मग नगरवासी योवाशाला म्हणू लागले, “तुझ्या मुलाला बाहेर आण; त्याला मारून टाकायचे आहे, कारण त्याने बआल देवाची वेदी पाडून टाकली आहे आणि तिच्याजवळची अशेरा मूर्ती तोडून टाकली आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan