Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 15:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्यावाचून त्याला आपल्याआपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हांलाही देता येणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्यावाचून त्यास आपल्याआपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हासही देता येणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहीन. जसे फाटा वेलीत राहिल्याशिवाय त्याला स्वतः फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हांलाही फळ देता येणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 म्हणून मजमध्ये राहा व मी तुम्हामध्ये राहीन. कोणतीही फांदी स्वतःहून फळ देऊ शकत नाही; तिला वेलीमध्येच राहणे भाग आहे. तसेच माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही फळ देता येणे शक्य नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 15:4
29 Iomraidhean Croise  

आपल्या वल्लभावर ओठंगून रानातून येत आहे ही कोण? सफरचंदाच्या झाडाखाली मी तुझे प्रेम जागृत केले; तेथे तुझी माता तुला प्रसवली; तुझ्या जननीला तेथे प्रसववेदना झाल्या.


एफ्राइमाला ह्यापुढे मूर्तींशी काय कर्तव्य आहे? मी तर त्याचे ऐकून त्याच्यावर लक्ष ठेवीन; मी हिरव्यागार सरूसारखा आहे; माझ्यापासून तुला फळ मिळते.


‘झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले’ असे म्हणा; अथवा ‘झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट’ असे म्हणा; कारण फळावरून झाड कळते.


चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की, ते वचन ऐकून सालस व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात.


त्या दिवशी तुम्हांला समजेल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे, व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुमच्यामध्ये आहे.


म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये; ह्यासाठी की, त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवलेस आणि जशी तू माझ्यावर प्रीती केलीस तशी त्यांच्यावरही प्रीती केलीस.


जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो.


ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात राहिलात तर खरोखर माझे शिष्य आहात;


तो तेथे पोहचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला; आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की, ‘दृढ निश्‍चयाने प्रभूला बिलगून राहा.’


आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की, ‘विश्वासात टिकून राहा; कारण आपल्याला पुष्कळ संकटांत टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.’


तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीती पाहा, येशू ख्रिस्त तुमच्या ठायी आहे असे तुम्ही स्वतःसंबंधाने समजता ना? नाहीतर तुम्ही पसंतीस1 उतरलेले नाही.


मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे; आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे; त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वत:ला माझ्याकरता दिले.


ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी; ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून,


आणि देवाचा गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने तुम्ही भरून जावे.


जर तुम्ही विश्वासात स्थिरावलेले व अढळ राहता, आणि जी सुवार्ता तुम्ही ऐकली, आकाशाखालच्या सर्व सृष्टीत जिची घोषणा झाली व जिचा मी पौल सेवक झालो आहे, तिच्या आशेपासून तुम्ही ढळला नाहीत तर हे होईल.


ह्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तो ते रहस्य आहे.


तर ख्रिस्त येशू जो प्रभू, ह्याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा;


ह्यामुळे मलाही आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्यास पाठवले; कोण जाणे, भुलवणार्‍याने तुम्हांला भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील.


परंतु ज्यांचा नाश होईल अशा ‘माघार घेणार्‍यांपैकी’ आपण नाही; तर जिवाच्या तारणासाठी ‘विश्वास ठेवणार्‍यांपैकी’ आहोत.


मी त्याच्या ठायी राहतो, असे म्हणणार्‍याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे.


ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही; जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र दोघांची प्राप्ती झाली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan