Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 13:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुऊ लागला, आणि कंबरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 त्यानंतर येशू एका गंगाळात पाणी ओतून आणि तो शिष्यांचे पाय धुऊ लागला व कमरेला बांधलेल्या कापडाने पुसू लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 नंतर घंगाळात पाणी ओतून तो शिष्यांचे पाय धुऊ लागला आणि कमरेस बांधलेल्या टावेलने पुसू लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 त्यानंतर त्यांनी मोठ्या गंगाळात पाणी ओतले आणि ते आपल्या शिष्यांचे पाय धुऊ लागले आणि आपल्या कमरेभोवती असलेल्या रुमालाने पुसू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 13:5
30 Iomraidhean Croise  

थोडे पाणी आणू द्या; तुम्ही आपले पाय धुऊन ह्या झाडाखाली विसावा घ्या.


तो त्यांना म्हणाला, “पाहा, महाराज, आपल्या दासाच्या घरी येण्याची कृपा करा; आजची रात्र राहा, पाय धुवा व सकाळी उठून मार्गस्थ व्हा;” पण ते म्हणाले, “नाही, आम्ही रात्रभर रस्त्यातच मुक्काम करू;”


नंतर त्याने त्या माणसांना योसेफाच्या घरात नेऊन पाणी दिले, आणि त्यांनी आपले पाय धुतले; त्याने त्यांच्या गाढवांना वैरणही दिली.


तेव्हा यहोशाफाट म्हणाला, “ज्याच्या द्वारे आपल्याला परमेश्वराला प्रश्‍न करता येईल असा परमेश्वराचा कोणी संदेष्टा येथे नाही काय?” इस्राएलाच्या राजाच्या सेवकांपैकी एकाने सांगितले, “एलीयाच्या हातावर पाणी घालणारा शाफाटाचा पुत्र अलीशा येथे आहे.”


मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर.


मग अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना दर्शनमंडपाच्या दारासमोर घेऊन ये व त्यांना आंघोळ घाल;


आपणांस धुवा, स्वच्छ करा; माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्मांचे दुष्टपण दूर करा; दुष्टपणा करण्याचे सोडून द्या;


मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल; तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती ह्यांपासून मी तुमची शुद्धी करीन.


आणि शुद्ध ठरवायच्या मनुष्याने आपले कपडे धुवावेत, आपले मुंडण करवावे आणि पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने छावणीत यावे; तरी त्याने सात दिवस आपल्या तंबूबाहेर राहावे.


पाप व अशुद्धता दूर करण्यास त्या दिवशी दाविदाच्या घराण्यासाठी व यरुशलेमनिवाशांसाठी एक झरा फुटेल.


आणि त्याच्या पायांशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली; तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले.


तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, “तुम्ही ह्या बाईला पाहता ना? मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुण्यासाठी पाणी दिले नाही; परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवून आपल्या केसांनी ते पुसले.


येशूने त्याला म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायांखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही. कारण तो सर्वांगी शुद्ध आहे; आणि तुम्ही शुद्ध आहात, पण सगळे जण नाहीत.”


मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण माझे पाय धुता काय?”


पेत्र त्याला म्हणाला, “तुम्ही माझे पाय कधीही धुवायचे नाहीत.” येशूने त्याला उत्तर दिले, “मी जर तुला धुतले नाही तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही.”


तरी शिपायांतील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला; आणि लगेच रक्त व पाणी बाहेर निघाले.


तर आता उशीर का करतोस? ऊठ, प्रभूच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकांचे क्षालन कर.’


आणि तुमच्यापैकी कित्येक तसे होते; तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झालात.


अशासाठी की, तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे,


जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असेल म्हणजे जिने मुलाबाळांचा प्रतिपाळ केला असेल, पाहुणचार केला असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांची गरज भागवली असेल, सर्व प्रकारच्या चांगल्या कृत्यांस अनुसरली असेल, अशी नावाजलेली विधवा यादीत नोंदण्यात यावी.


म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खर्‍या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खातरीने जवळ येऊ.


पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.


जो पाण्याच्या द्वारे व रक्ताच्या द्वारे आला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त; पाण्याने केवळ नव्हे, तर पाण्याने व रक्तानेही आला. आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे.


आणि ‘विश्वसनीय साक्षी,’ मेलेल्यांमधून ‘प्रथम जन्मलेला’ व ‘पृथ्वीवरील राजांचा अधिपती’ येशू ख्रिस्त ह्याच्यापासून, तुम्हांला कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हांला ‘पातकांतून मुक्त केले,’


मी म्हटले, “प्रभो, हे तुला ठाऊक आहे.” तो मला म्हणाला, “मोठ्या ‘संकटातून’ येतात ते हे आहेत; ह्यांनी ‘आपले झगे’ कोकर्‍याच्या ‘रक्तात धुऊन’ शुभ्र केले आहेत.


मग त्याने त्याला आपल्या घरी नेले व त्याच्या गाढवांना वैरण दिली, आणि त्यांनी हातपाय धुऊन भोजन केले.


ती उठून भूमीपर्यंत लवून म्हणाली की, “आपली दासी माझ्या स्वामींच्या दासांचे चरण धुणारी दासी होण्यास सिद्ध आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan