Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 13:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तुम्ही मला गुरू व प्रभू असे संबोधता आणि ते ठीक बोलता; कारण मी तसा आहेच.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तुम्ही मला ‘गुरू’ आणि ‘प्रभू’ म्हणता आणि ते ठीक म्हणता, कारण मी तसाच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

13 तुम्ही मला गुरू व प्रभू असे संबोधता आणि ते योग्य आहे कारण मी तसा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तुम्ही मला ‘गुरुजी’ आणि ‘प्रभूजी’ असे संबोधता आणि ते खरे आहे, यासाठी की तो मी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 13:13
18 Iomraidhean Croise  

परमेश्वर मला म्हणाला, “तुला ठीक दिसले; मी आपले वचन पूर्ण करण्यास सावध2 राहीन.”


ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.”


त्याने त्याला म्हटले, “ठीक उत्तर दिलेस; हेच कर म्हणजे जगशील.”


तुम्ही मला ‘प्रभू, प्रभू’ म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही?


शिमोनाने उत्तर दिले, “ज्याला अधिक सोडले तो, असे मला वाटते.” मग तो त्याला म्हणाला, “बरोबर ठरवलेस.”


ज्या मरीयेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले तिचा हा, आजारी पडलेला लाजर, भाऊ होता.


असे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरीया हिला गुप्तपणे बोलावून म्हणाली, “गुरूजी आले आहेत व ते तुला बोलावत आहेत.”


म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठवले की, “प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे.”


म्हणून मी तुम्हांला कळवतो की, देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही माणूस “येशू शापित आहे”3 असे म्हणत नाही, आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्यावाचून कोणालाही “येशू हा प्रभू आहे” असे म्हणता येत नाही.


तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहोत; आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्या द्वारे अवघे झाले व आपण त्याच्या द्वारे आहोत.


धन्यांनो, तुम्हीही त्यांच्याशी तसेच वागा; व धमकावण्याचे सोडून द्या, कारण तुम्हांला हे ठाऊक आहे की, तुमचा व त्यांचा धनी स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही.


आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.


इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा,


एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोस; भुतेही तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan