Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 11:51 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

51 हे तर तो आपल्या मनचे बोलला नाही, तर त्या वर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की, येशू त्या राष्ट्राकरता मरणार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

51 आणि हे तर तो आपल्या मनाचे बोलला नाही; तर त्या वर्षी तो मुख्य याजक असल्यामुळे त्याने संदेश दिला की, येशू त्या राष्ट्रासाठी मरणार आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

51 खरे म्हणजे हे तो आपल्या मनातले बोलला नाही, तर त्या वर्षी तो उच्च याजक होता म्हणून त्याने भाकीत केले की, येशू राष्ट्राकरता मरणार होता

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

51 हे तो आपल्या मनाचे बोलला नाही, त्या वर्षाचा महायाजक म्हणून त्याने भविष्य केले की, येशू यहूदी राष्ट्राकरिता मरणार आहेत,

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 11:51
23 Iomraidhean Croise  

तू न्यायाच्या ऊरपटात उरीम व थुम्मीम1 ठेव. अहरोन परमेश्वरासमोर येईल तेव्हा ते त्याच्या हृदयावर असावे; ह्या प्रकारे अहरोनाने इस्राएल लोकांचा न्याय आपल्या हृदयावर परमेश्वरासमोर नित्य वागवावा.


बासष्ट सप्तके संपल्यावर अभिषिक्ताचा वध होईल, व त्याला काही उरणार नाही; आणि जो अधिपती येईल त्याचे लोक नगर व पवित्रस्थान उद्ध्वस्त करतील; त्याचा अंत पुराने होईल; युद्ध अंतापर्यंत चालेल; सर्वकाही उजाड होण्याचे ठरले आहे.


तेव्हा परमेश्वराने त्या गाढवीला वाचा दिली. ती बलामाला म्हणाली, “मी तुझे काय केले म्हणून तू तीनदा मला मारलेस?”


बलामाने दृष्टी वर करून पाहिले तर, इस्राएल लोक आपापल्या वंशांप्रमाणे वस्ती करून राहत आहेत असे त्याला दिसले; देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला.


ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.”


तेव्हा त्यांच्यापैकी कयफा नावाचा कोणीएक मनुष्य जो त्या वर्षी प्रमुख याजक होता, तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला काहीच कळत नाही;


त्यांनी त्याला प्रथम हन्नाकडे नेले; कारण त्या वर्षी प्रमुख याजक असलेल्या कयफाचा हा सासरा होता.


मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या, आणि डोंगर ढळवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही.


ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या-आमच्याकरता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.


आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले; “जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे” असा शास्त्रलेख आहे;


‘त्याने स्वतः तुमची आमची पापे’ स्वदेही ‘वाहून’ खांबावर ‘नेली’, ह्यासाठी की, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या ‘माराने तुम्ही निरोगी झाला आहात.’


कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापांबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले. तो देहरूपात जिवे मारला गेला आणि आत्म्यात2 जिवंत केला गेला;


आणि तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्‍चित्त आहे; केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे.


शौल आपला नाश करण्याची मसलत करीत आहे हे दाविदाला समजले तेव्हा तो अब्याथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आण.”


शौलाने परमेश्वराला प्रश्‍न विचारले असता परमेश्वराने स्वप्ने, उरीम अथवा संदेष्टे अशा कोणाच्याही द्वारे उत्तर दिले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan