Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 11:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तेथे यहूद्यांपैकी पुष्कळ लोक मार्था व मरीया ह्यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यास आले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 आणि यहूदी लोकांपैकी पुष्कळजण मार्था व मरीया यांच्याकडे त्यांच्या भावाबद्दल त्यांचे सांत्वन करण्यास आले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 आणि पुष्कळ यहुदी लोक मार्था व मरिया ह्यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यासाठी तेथे आले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 आणि अनेक यहूदी लोक मार्था व मरीया यांच्या भावाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे सांत्वन करण्यासाठी आले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 11:19
28 Iomraidhean Croise  

त्याचे मुलगे व मुली हे सर्व त्याचे सांत्वन करायला त्याच्याजवळ गेले, पण तो काही केल्या समाधान न पावता म्हणाला, “मी शोक करत करत अधोलोकी आपल्या मुलाकडे जाईन.” असा त्याच्या बापाने त्याच्यासाठी शोक केला.


तेव्हा दावीद म्हणाला, “हानूनाचा बाप नाहाश ह्याने आपल्यावर दया केली तशीच मी त्याच्या पुत्रावर दया करीन.” म्हणून दाविदाने त्याच्या पित्याच्या मृत्यूबद्दल त्याचे सांत्वन करायला आपल्या सेवकांच्या हाती त्याला सांत्वनाचा निरोप पाठवला. मग दाविदाचे सेवक अम्मोनी लोकांच्या देशात आले.


तेव्हा तेथले सर्व शूर वीर निघाले आणि त्यांनी शौल व त्याचे पुत्र ह्यांची प्रेते याबेश येथे आणली व त्यांच्या अस्थी घेऊन याबेशातील एका वृक्षाखाली पुरल्या आणि सात दिवस उपास केला.


ईयोबाचे तिघे मित्र अलीफज तेमानी, बिल्दद शूही व सोफर नामाथी हे त्याच्यावर आलेल्या अरिष्टांविषयी ऐकून आपापल्या ठिकाणाहून निघाले; ईयोबाकडे आपण मिळून जावे व त्याच्या संकटाबद्दल खेद प्रदर्शित करून त्याचे समाधान करावे असा त्यांनी संकेत केला.


मग त्याचे सर्व बंधू व भगिनी आणि पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याच्याकडे आले, आणि त्यांनी त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून भोजन केले; आणि परमेश्वराने त्याच्यावर जी विपत्ती आणली होती तिच्याविषयी दुःख प्रदर्शित करून त्यांनी त्याचे समाधान केले; प्रत्येकाने त्याला एक कसीटा1 व एक सोन्याची अंगठी दिली.


भोजनोत्सवगृही जाण्यापेक्षा शोकगृही जाणे बरे; कारण प्रत्येक मनुष्याचा शेवट हाच आहे; जिवंताच्या मनात ही गोष्ट बिंबून राहील.


तुझ्यावर ह्या दोन गोष्टी गुदरल्या : उजाडी व नाश, दुष्काळ व तलवार; तुझे समाधान कोण करील? मी तुझे सांत्वन कसे करू?


ह्या सर्वांमुळे मी रडत आहे; माझा डोळा, माझा डोळा अश्रू ढाळत आहे; कारण माझ्या जिवाचे समाधान व सांत्वन करणारा मला अंतरला आहे; माझी मुले नष्ट झाली आहेत, कारण शत्रू प्रबल झाला आहे.”


ती रात्रभर रुदन करीत राहते, तिच्या गालांवर अश्रू आलेले आहेत; तिच्या सर्व वल्लभांपैकी तिचे सांत्वन करणारा कोणी नाही; तिच्या सर्व मित्रांनी तिला दगा दिला आहे; ते तिचे शत्रू बनले आहेत.


त्यांनी ऐकले की मी उसासा टाकत आहे व मला सांत्वन देणारा कोणी नाही; माझ्या सर्व वैर्‍यांनी माझ्या विपत्तीविषयी ऐकले आहे; तू हे केले म्हणून त्यांना आनंद झाला आहे. तू नेमलेला दिवस आणला म्हणजे ते माझ्यासारखे होतील.


तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्त्राला लागला आहे; ती आपला अंतकाळ स्मरली नाही; म्हणून ती विलक्षण प्रकारे अधोगतीस गेली आहे; तिचे सांत्वन करणारा कोणी नाही. “हे परमेश्वरा, माझी विपत्ती पाहा! वैरी तोरा मिरवत आहे.”


मी तुला बोधाच्या कोणत्या गोष्टी सांगू? हे यरुशलेमकन्ये, मी तुला कोणाची उपमा देऊ? हे सीयोनेच्या कुमारी कन्ये, तुझे सांत्वन करण्यासाठी मी तुझी कोणाबरोबर तुलना करू? तुझा विनाश सागरासारखा मोठा आहे; तुला कोण बरे करील?


तिला मरीया नावाची एक बहीण होती; तीही प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली.


परंतु थोडक्याच गोष्टींचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे; मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”


पुढे यहूद्यांनी यरुशलेमेहून याजक व लेवी ह्यांना योहानाला “आपण कोण आहात?” असे विचारण्यास पाठवले तेव्हाची त्याची साक्ष हीच आहे.


बेथानी येथील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता; मरीया व तिची बहीण मार्था ह्या त्याच गावच्या होत्या.


जे यहूदी मरीयेजवळ घरात होते व तिचे सांत्वन करत होते त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिल्यावर, ती कबरेकडे रडायला जात आहे असे समजून ते तिच्यामागे गेले.


येशू तिला व तिच्याबरोबर आलेल्या यहूद्यांना रडताना पाहून आत्म्यात खवळला व विव्हळ झाला,


ह्यावरून यहूदी म्हणाले, “पाहा, ह्याचे त्याच्यावर कितीतरी प्रेम होते!”


मरीयेकडे आलेल्या यहूद्यांनी येशूने जे केले ते पाहिले, आणि त्यांच्यापैकी पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला;


शिष्य त्याला म्हणाले, “गुरूजी, यहूदी नुकतेच तुम्हांला दगडमार करायला पाहत होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे जाता काय?”


आनंद करणार्‍यांबरोबर आनंद करा आणि शोक करणार्‍यांबरोबर शोक करा.


तो आमच्यावरील सर्व संकटांत आमचे सांत्वन करतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हांला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे.


म्हणून ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा.


म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्नती करा; असे तुम्ही करतच आहात.


त्यांनी त्यांच्या अस्थी याबेशात चिंचेच्या झाडाखाली नेऊन पुरल्या आणि सात दिवस उपास केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan