Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 11:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 हे बोलल्यावर तो त्यांना म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपला आहे; पण मी त्याला झोपेतून उठवायला जातो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 येशू या गोष्टी बोलल्यावर, तो त्यांना म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्यास झोपेतून उठवावयास जातो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

11 हे बोलल्यावर तो त्यांना पुढे म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपला आहे, पण मी त्याला झोपेतून उठवायला जाणार आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 असे म्हटल्यानंतर, मग येशू त्यांना सांगू लागले, “आपला मित्र लाजर झोपी गेला आहे, परंतु मी जाऊन त्याला झोपेतून जागे करतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 11:11
25 Iomraidhean Croise  

गेहजीने पुढे जाऊन त्या मुलाच्या तोंडाला काठी लावली, पण त्याने आवाज किंवा हालचाल केली नाही. तो अलीशाकडे परत येऊन म्हणाला, “मूल काही जागे होत नाही.”


हे आमच्या देवा, तू ह्या देशाच्या रहिवाशांना आपल्या इस्राएल प्रजेपुढून घालवून देऊन हा देश तुझा मित्र अब्राहाम ह्याच्या वंशजांना कायमचा दिला आहेस ना?


मित्राशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे परत जात असे, तरी त्याचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा, हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत नसे. परमेश्वराच्या समक्षतेचे आश्वासन


माझ्या सेवका, इस्राएला, माझ्या निवडलेल्या याकोबा, माझा मित्र अब्राहाम ह्याच्या संताना,


भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल; कित्येक सर्वकाळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्वकाळचा धिक्कार मिळवण्यास उठतील.


थडगी उघडली, आणि निजलेल्या पवित्र जनांतील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली;


“वाट सोडा, कारण मुलगी मेली नाही; ती झोपेत आहे.” तेव्हा ते त्याला हसू लागले.


तो आत जाऊन त्यांना म्हणाला, “तुम्ही का गोंधळ करता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे.”


परंतु जर कोणी रात्री चालतो तर त्याला ठेच लागते, कारण त्याच्या ठायी उजेड नसतो.”


ह्यावरून शिष्य त्याला म्हणाले, “प्रभूजी, त्याला झोप लागली असेल तर तो बरा होईल.”


येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता; परंतु तो झोपेतून मिळणार्‍या आरामाविषयी बोलतो असे त्यांना वाटले.


म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठवले की, “प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे.”


वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे, त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो; तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.


मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नकोस.” असे बोलून तो झोपी गेला.


आणि ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा घेत आहेत त्यांचाही नाश झाला आहे.


नीतिमत्त्वासंबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका; कारण कित्येकांना देवासंबंधीचे ज्ञान नाही; हे मी तुम्हांला लाजवण्यासाठी बोलतो.


पाहा, मी तुम्हांला एक रहस्य सांगतो; आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व जण बदलून जाऊ;


म्हणून तो म्हणतो,1 “हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ. म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल.”2


तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “पाहा, तू लवकरच आपल्या पूर्वजांबरोबर कालनिद्रा घेणार आहेस; मग हे लोक ज्या देशात जाणार आहेत त्यातल्या लोकांमध्ये आल्यावर अन्य देवांच्या मागे व्यभिचारी मतीने लागण्यास प्रवृत्त होतील, व माझा त्याग करून मी त्यांच्याशी केलेला करार मोडतील.


प्रभू येशू ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला, ह्यासाठी की, आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे.


“अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले;” आणि त्याला ‘देवाचा मित्र’ म्हणण्यात आले, हा शास्त्रलेख पूर्ण झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan