Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 1:49 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

49 नथनेल त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्राएलाचे राजे आहात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

49 नथनेलाने उत्तर दिले, “रब्बी, आपण देवाचे पुत्र आहा, आपण इस्राएलाचे राजे आहात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

49 नथनेल त्याला म्हणाला, “गुरुवर्य, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्राएलचे राजे आहात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

49 नाथानाएलाने जाहीर केले, “गुरुजी, आपण परमेश्वराचे पुत्र; आपण इस्राएलचे राजे आहात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 1:49
31 Iomraidhean Croise  

माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो, “मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.”


तो म्हणेल, “मी आपल्या पवित्र सीयोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे.”


त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार; तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व नीतिमत्तेने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.


हे कळून येऊ दे व समजून घे की यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्त,1 अधिपती असा जो तो येईपर्यंत सात सप्तकांचा अवकाश आहे व बासष्ट सप्तके लोटल्यावर1 धामधुमीचा काळ असताही नगर, रस्ते व खंदक ह्यांसह बांधतील.


हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे.


परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे, तुझ्या शत्रूचे निवारण केले आहे; इस्राएलाचा राजा परमेश्वर तुझ्यामध्ये आहे; तुला पुन्हा अरिष्टाची भीती प्राप्त होणार नाही.


सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे.


तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, “आपण खरोखर देवाचे पुत्र आहात.”


“यहूद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत.”


“सीयोनेच्या कन्येला सांगा, पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर, म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे.”


बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरूजी म्हणवून घेणे त्यांना आवडते.


तुम्ही तर आपणांस गुरूजी म्हणवून घेऊ नका; कारण तुमचा एकच गुरू [ख्रिस्त] आहे व तुम्ही सर्व भाऊभाऊ आहात.


मग येशूला सुभेदाराच्या पुढे उभे केले असता सुभेदाराने त्याला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने त्याला म्हटले, “आपण म्हणता तसेच.”


“त्याने दुसर्‍यांना वाचवले; त्याला स्वतःला वाचवता येत नाही; तो इस्राएलाचा राजा आहे; त्याने आता वधस्तंभावरून खाली उतरावे, म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू.


तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, “तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर.”


इस्राएलाचा राजा ख्रिस्त ह्याने आता वधस्तंभावरून खाली यावे म्हणजे ते पाहून आम्ही विश्वास धरू.” त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेली माणसेही त्याची निंदा करत होती.


देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र, असे म्हणतील.


“‘प्रभूच्या नावाने येणारा’ राजा ‘धन्यवादित असो;’ स्वर्गात शांती, आणि ऊर्ध्वलोकी गौरव.”


देवाला कोणीही कधीच पाहिले नाही; जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे.


मी स्वत: पाहिले आहे व साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.”


तेव्हा येशू वळून त्यांना आपल्यामागे येताना पाहून म्हणाला, “तुम्ही काय शोधता?” ते त्याला म्हणाले, “रब्बी, (म्हणजे गुरूजी) आपण कोठे राहता?”


येशू त्याला म्हणाला, “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास धरतोस काय? ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील.”


ह्यावरून पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.”


शिष्य त्याला विनंती करू लागले की, “गुरूजी, जेवा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan