Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




योहान 1:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 पुढे यहूद्यांनी यरुशलेमेहून याजक व लेवी ह्यांना योहानाला “आपण कोण आहात?” असे विचारण्यास पाठवले तेव्हाची त्याची साक्ष हीच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 आणि योहानाची साक्ष ही आहे; जेव्हा यहूदी अधिकाऱ्यांनी यरूशलेम शहराहून याजक व लेवी यांना त्यास विचारायला पाठवले की, “तू कोण आहे?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 यहुद्यांनी यरुशलेमहून याजक व लेवी ह्यांना पाठवून योहानला विचारले, “आपण कोण आहात?” तेव्हा योहानने दिलेली ही साक्ष आहेः

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 जेव्हा यहूदी पुढार्‍यांनी यरुशलेम येथून याजक आणि लेवी यांना योहानाकडे विचारपूस करावयास पाठविले की तो कोण आहे, त्यावेळी योहानाने दिलेली ही साक्ष होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac




योहान 1:19
27 Iomraidhean Croise  

तो साक्षीकरता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरता आला; ह्यासाठी की, त्याच्या द्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा.


तेव्हा यहूद्यांनी त्याला गराडा घालून म्हटले, “तुम्ही कोठवर आमची मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असलात तर आम्हांला उघड सांगा.”


तेव्हा यहूद्यांनी त्याला दगडमार करायला पुन्हा दगड उचलले.


तेथे यहूद्यांपैकी पुष्कळ लोक मार्था व मरीया ह्यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यास आले होते.


त्यावरून यहूदी त्याला म्हणाले, “तुम्ही हे करता तर आम्हांला तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता?”


ह्यावरून यहूदी म्हणाले, “हे मंदिर बांधण्यास सेहेचाळीस वर्षे लागली आणि तुम्ही हे तीन दिवसांत उभारणार काय?”


ह्यावरून यहूदी त्या बर्‍या झालेल्या माणसाला म्हणाले, “आज शब्बाथ आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही.”


त्या माणसाने जाऊन यहूद्यांना सांगितले, “ज्याने मला बरे केले तो येशू आहे.”


ह्यामुळे यहूदी येशूच्या पाठीस लागून त्याला जिवे मारायला पाहू लागले, कारण तो शब्बाथ दिवशी अशी कामे करत असे.


ह्यामुळे तर यहूदी त्याला जिवे मारण्याची अधिकच खटपट करू लागले; कारण तो शब्बाथ मोडत असे इतकेच नाही, तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवासमान करत असे.


‘मी स्वर्गातून उतरलेली भाकर आहे,’ असे तो म्हणाला म्हणून यहूदी त्याच्याविषयी कुरकुर करू लागले.


तेव्हा यहूदी आपसांमध्ये वितंडवाद करू लागले व म्हणाले, “हा आपला देह आम्हांला खायला कसा देऊ शकतो?”


ह्यानंतर येशू गालीलात फिरू लागला; कारण यहूदी त्याला जिवे मारायला पाहत होते, म्हणून त्याला यहूदीयात फिरावेसे वाटले नाही.


तेव्हा यहूदी त्या सणात त्याचा शोध करत होते व म्हणत होते, “तो आहे तरी कोठे?”


ह्यावरून यहूदी आश्‍चर्य करून म्हणू लागले, “शिकल्यावाचून ह्याला विद्या कशी आली?”


ह्यावर यहूदी म्हणाले, “‘मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही’ असे हा म्हणतो, ह्यावरून हा आत्महत्या तर करणार नाही?”


यहूद्यांनी त्याला उत्तर दिले, “तुम्ही शोमरोनी आहात व तुम्हांला भूत लागले आहे, हे जे आम्ही म्हणतो ते बरोबर आहे की नाही?”


यहूदी त्याला म्हणाले, “तुम्हांला भूत लागले आहे हे आता आम्हांला कळले. अब्राहाम मेला व संदेष्टेही मेले, आणि तुम्ही म्हणता, ‘जर कोणी माझे वचन पाळील तर त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही.’


तेव्हा यहूदी त्याला म्हणाले, “तुम्हांला अजून पन्नास वर्षे झाली नाहीत आणि तुम्ही अब्राहामाला पाहिले आहे काय?”


योहान आपले कार्य पूर्ण करत असता म्हणाला, ‘मी कोण आहे म्हणून तुम्हांला वाटते? मी तो नव्हे, तर पाहा, ज्याच्या पायांतील वहाणा सोडण्यास मी योग्य नाही असा कोणी माझ्यामागून येत आहे.’


पौलाने म्हटले, “योहान पश्‍चात्तापाचा बाप्तिस्मा देत असे; तो लोकांना सांगत असे की, माझ्यामागून येणार्‍यावर म्हणजे येशूवर तुम्ही विश्वास ठेवावा.”


महारोगाच्या व्याधीसंबंधाने सांभाळा; लेवीय याजक तुम्हांला जे शिकवतील ते अगदी काळजीपूर्वक पाळा; मी त्यांना आज्ञा केली आहे त्याप्रमाणे काळजीपूर्वक पाळा.


जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हांला विदित करतो; तो संदेश हा की, देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan